देवांग कोष्टी समाजातर्फे हळदी-कुंकू
By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST
अहमदनगर : देवांग कोष्टी समाज विकास मंडळातर्फे शाकंभरी पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, वधू-वर परिचय मेळावा, ज्येष्ठांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी नगरसेवक बहिरनाथ वाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. चौंडेश्वरी मातेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. सामाजिक उपक्रमांबद्दल महिला कार्यकर्त्यांची भाषणे झाली. रविदीप कवडे यांनी सूत्रसंचालन केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
देवांग कोष्टी समाजातर्फे हळदी-कुंकू
अहमदनगर : देवांग कोष्टी समाज विकास मंडळातर्फे शाकंभरी पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, वधू-वर परिचय मेळावा, ज्येष्ठांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी नगरसेवक बहिरनाथ वाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. चौंडेश्वरी मातेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. सामाजिक उपक्रमांबद्दल महिला कार्यकर्त्यांची भाषणे झाली. रविदीप कवडे यांनी सूत्रसंचालन केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. ------------