शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हज अनुदान बंद; मुस्लीम संघटनांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 03:57 IST

हज यात्रेसाठी केंद्राकडून देण्यात येणारे ७०० कोटी रुपयांचे अनुदान बंद करण्याच्या निर्णयाबाबत मुस्लीम संघटना, संस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.

हज यात्रेसाठी केंद्राकडून देण्यात येणारे ७०० कोटी रुपयांचे अनुदान बंद करण्याच्या निर्णयाबाबत मुस्लीम संघटना, संस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे. केंद्राकडून दिल्या जाणा-या निधीचा लाभ प्रत्यक्षात हज यात्रेकरूंना मिळतच नव्हता. त्यामुळे या निर्णयामुळे फारसा परिणाम होणार नाही. मात्र यापुढे सरकारने हज यात्रेसाठी जागतिक निविदा मागवून कंपन्यांशी करार करावा, अशी मागणी त्यांच्यातून व्यक्त करण्यात आली.शिफारशीची अंमलबजावणी करावीकेंद्राचा हा निर्णय चुकीचा असून अल्पसंख्याक समाजावर अन्याय करणारा आहे. हज यात्रेप्रमाणे सरकार आता अन्यधर्मीयांच्या विविध यात्रा, कुंभमेळावे यासाठी देण्यात येणारा निधी बंद करणार आहे का? ते स्पष्ट केले पाहिजे. वास्तविक हज यात्रेकरूंना याचा फारसा लाभ होत नव्हता. केंद्र सरकार एअर इंडियाचा तोटा त्यामार्फत भरून काढत होते. रद्द केलेले अनुदान अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांचे शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, रोजगार मेळावे आदी कामांसाठी वापरावे. त्याचप्रमाणे हज यात्रेच्या प्रवासासाठी यापुढे हवाई व जल वाहतूक कंपन्यांची निवड जागतिक स्तरावर निविदा मागवून करण्यात यावी. त्यामुळे प्रवास कमी होईल. न्या. सच्चर आयोगाने सुचविलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करावी.- हुमायून शेख (मुंबई सचिव, जमायत-इस्लामी हिंद)परिणाम नाहीइस्लाममध्ये ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, त्यांच्यासाठी हज करणे अनिवार्य आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंवर या निर्णयामुळे फारसा परिणाम होणार नाही. - समशेरखान पठाण(अध्यक्ष, आवामी विकास पार्टी)सामाजिक हितासाठी उपयोग करावाअनुदानाचा हज यात्रेकरूंना फारसा लाभ होत नव्हता. त्यामुळे रद्द केलेले अनुदान अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांचे शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, रोजगार मेळावे आदी सामाजिक हिताच्या कामांसाठी वापरावे.- हाजी जतकर (अध्यक्ष, मारक्का)निर्णय अपेक्षित होताकेंद्र सरकार हे अल्पसंख्याक समाजाविरोधात आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे हा निर्णय होणे अपेक्षितच होते. मात्र सरकार लोकशाहीवर विश्वास ठेवणारे असल्यास त्यांनी हज यात्रेसाठी रद्द केलेले अनुदान अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांचे शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, रोजगार मेळावे आदी कामांसाठी वापरावे.- अलामा बुनिया हसन (सरचिटणीस, आॅल इंडिया उलेमा बोर्ड)...तर कडाडून विरोधहज अनुदान बंद करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मात्र हा निधी आता अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी खर्च करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण, मुस्लीमबहुल भागांमध्ये मूलभूत सुविधा, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी वापरून मोदी सरकारने प्रत्यक्षात ‘सबका साथ, सबका विकास’ या आश्वासनांची पूर्तता करावी. त्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत. हजच्या अनुदानातील निधी अल्पसंख्याक समाजाव्यतिरिक्त अन्यत्र वापरला गेल्यास त्याला कडाडून विरोध केला जाईल.- अबू आझमी (आमदार व प्रदेशाध्यक्ष, समाजवादी पार्टी)

टॅग्स :Haj yatraहज यात्रा