उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस
By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST
एकाच रात्री तीन घरफोड्या : रोख आिण दािगने लंपास
उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस
एकाच रात्री तीन घरफोड्या : रोख आिण दािगने लंपास नागपूर : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. एकाच रात्री त्यांनी तहसीलमधील एका लग्नाच्या घरासह कळमना आिण जरीपटक्यात घरफोड्या करून रोख आिण दािगने लंपास केले. तहसीलमधील फैज तािलम आखाडा जवळ राहाणार्या मोहम्मद अख्तर कादर खान (वय ६५) यांच्याकडे लग्नाची तयारी सुरू आहे. त्यामुळे रोख, कपडे, दािगने आिण अन्य िचजवस्तू त्यांनी घेऊन ठेवल्या आहेत. चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून लोखंडी पेटीतील रोख २३ हजार, सोन्याचांदीचे दािगने, गॅसशेगडी, लग्नाचे कपडे आिण इतर िचजवस्तू चोरून नेल्या. सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर पिरसरात खळबळ िनमार्ण झाली.अशाच प्रकारे कळमन्यातील जय भारत शाळेच्या मागे, िदनबंधू नगर (पारडी) येथील हेमराज मारोती कटरे (वय ४४) यांच्याकडे घरफोडी झाली. ते बुधवारी रात्री आजारी आईला बघण्यास बाहेरगावी गेले. त्यांची मुले काकांकडे झोपायला गेली. आज सकाळी ७ वाजता मुले घरी परतली तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दािगने आिण रोख १६,५०० रुपये असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. आज पहाटे जरीपटका भीम चौकातील प्रमोद बाबुरावजी थोटे (वय ३८) यांच्याकडेही घरफोडी झाली. चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दािगने आिण रोख ३ हजार असा एकूण ७३ हजारांचा ऐवज चोरून नेला. घरफोडीच्या या ितन्ही घटनांची नोंद अनुक्रमे कळमना, जरीपटका आिण तहसील पोिलसांनी केली. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. ---