शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

हाफिज सईद भारताविरोधात पुन्हा बरळला, म्हणाला 1971 चा सूड घेण्यासाठी काश्मीर हाच मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 21:58 IST

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद पुन्हा एकदा भारताविरोधात बरळला आहे.

लाहोर-  मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद पुन्हा एकदा भारताविरोधात बरळला आहे. मशरिकी पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) चा सूड घ्यायचा असेल तर काश्मीर हा त्यासाठीचा मार्ग आहे. सूड घेण्यासाठी काश्मीरमधून आपण वाट काढू, असं हाफिज सईदने म्हंटलं आहे. लाहोरमध्ये झालेल्या सभेत तो बोलत होता. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका यांनी हाफिज सईदला दहशतवादी घोषित केलं आहे. तर दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच नजरकैदेतून त्याची सुटका केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. 

 

अमेरिकेने हाफिज सईदवर 1 कोटी रूपयांचं बक्षीस ठेवलं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना शिक्षा देण्याबाबत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत गंभीर नाही, अशी प्रतिक्रिया भारताने हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर दिली होती. आता याच हाफिज सईदने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकत 1971 चा बदला घ्यायचा असल्याचं म्हटलं आहे.

आठवड्याभरापूर्वी पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यासोबत हाफिज सईद युती करणार असल्याचंही वृत्त होतं. नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने 2018 मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं होतं. तसंच जमात उद दावा या दहशतवादी संघटनेने ऑगस्ट महिन्यात मिल्ली मुस्लिम लीग या पक्षाचीही स्थापना केली आहे. हाफिजच्या नजरकैदेत वाढ करण्याची मागणी पाकिस्तान सरकारने केली होती. पण पुराव्यांअभावी त्याची नजरकैदेतून सुटका करण्यात आली.