शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'सोनिया गांधींनी पाठिंबा दिला नसता, तर तेलंगणाची निर्मिती झाली नसती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 05:29 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य

हैदराबाद : काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली नसती, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी काँग्रेसने विजयाभेरी यात्रेचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी झालेले राहुल गांधी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत.त्यांनी एका सभेत सांगितले की, तेलंगणासह, राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस भाजपचा पराभव करणार आहे. काँग्रेसकडून तेलंगणात भारत राष्ट्र समिती पराभूत होईल. भारत राष्ट्र समितीच्या सरकारने या राज्याचा विकास केलेला नाही. तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जितक्या पैशांची लूट केली, तो सारा पैसा आम्ही जनतेला परत देणार आहोत. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस पक्ष संसदेत भाजपला पाठिंबा देतो. या गोष्टी जनतेने नीट समजून घ्याव्यात, असे राहुल गांधी यांनी जगतियाल येथील प्रचारसभेत सांगितले. (वृत्तसंस्था)

ही सरंजामदार विरुद्ध जनता अशी लढाईराहुल गांधी म्हणाले, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे तेलंगणाशी (त्यावेळी हा प्रदेश आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता) जिव्हाळ्याचे संबंध होेते. तेलंगणातील विधानसभा निवडणूक म्हणजे सरंजामदार विरुद्ध सामान्य जनता अशी लढाई आहे. 

राहुल गांधी यांनी बनविला डोसाविजयाभेरी यात्रेदरम्यान राहुल गांधी जगतियालनजीक एका खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर थांबले. तिथे त्यांनी स्वत: डोसा बनविला आणि साेबतच्या लाेकांना खाऊ घातला. त्यांनी परिसरातील मुलांना चॉकलेटही वाटली, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. 

हळद उत्पादकांना प्रति क्विंटल १२-१५ हजार रुपयेतेलंगणामध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १२ ते  १५ हजार रुपये आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विजयाभेरी यात्रेचे आयोजन केले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTelanganaतेलंगणा