शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Gyanvapi Mosque Row: ...तर या देशात पुन्हा 1980-90 सारखा काळ येऊ नये; ज्ञानवापी सर्व्हेवर ओवेसींचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 20:42 IST

AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ज्या प्रकारे आमच्याकडून बाबरी मशीद हिसकावून घेण्यात आली, त्याचप्रकारे आताही प्रयत्न होत आहेत.

ज्ञानवापी सर्व्हेसंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यावेळी, मशिदीत शिवलिंग आढळल्याच्या दव्यानंतर, न्यायालयाने संबंधित जागा सील करण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. याच वेळी कुणालाही नमाज अदा करण्यापासून रोखू नये, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. यासंदर्भात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया देत, पुन्हा एकदा, मशिदीचे सर्वेक्षण 1991 च्या कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

खाल्या कोर्टातील आदेश चुकीचा - न्यायालयातील सुनावणीनंतर ओवेसी म्हणाले, खालच्या कोर्टाने मुस्लीम पक्षाची बाजू न ऐकताच, वुजूच्या जागेला सील करण्याचा आदेश दिला होता. ते म्हणाले, कालच्या कोर्टाचा आदेश पूर्णपणे बे-कायदेशीर आहे. आम्हाला आशा होती, की सर्वोच्च न्यायालय त्या आदेशाला स्थगिती देईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही निराश झालो आहोत.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ट्रायल कोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे स्थगिती द्यायला हवी. कारण ज्ञानवापी मशिदीचा सर्वे पूर्णपणे चुकीचा आहे. एवढेच नाही, तर या सर्व्हेवर जोवर पूर्णपणे स्थगिती येत नाही. तोवर आम्हाला न्याय मिळणार नाही.

AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ज्या प्रकारे आमच्याकडून बाबरी मशीद हिसकावून घेण्यात आली, त्याचप्रकारे आताही प्रयत्न होत आहेत. असाच प्रयत्न मथुरा, हाजी अली दर्ग्यासाठीही सुरू आहे. जर असेच सुरू राहिले, तर या देशात पुन्हा 1980-90 सारखा काळ येऊ नये. जर असे झाले, तर यासाठी आज जे लोक हे मुद्दे उपस्थित करत आहेत, तेच जबाबदार असतील, असेही ओवेसी म्हणाले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMosqueमशिद