शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गुपकार आघाडी, काँग्रेस काश्मिरात येणार एकत्र, १३ जिल्हा पंचायती ताब्यात घेण्यासाठी हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 01:09 IST

Kashmir : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आण‍ि काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. २० जिल्ह्यांतील एकूण २८० जागांसाठी मतदान झाले होते.

श्रीनगर : जम्मू आण‍ि काश्मीरमध्ये झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत गुपकार आघाडीने शंभरहून अधिक जागा जिंकून मोठे यश मिळविले आहे. काँग्रेसनेही समाधानकारक कामगिरी केली आहे. आता जिल्ह्यात सत्ता स्थापनेसाठी गुपकार आघाडी आण‍ि काँग्रेस एकत्र येणार असून, दोन्ही मिळून १३ जिल्ह्यांत सत्ता स्थापन करणार आहेत, तर भाजपकडे ७ जिल्ह्यांतील सत्ता येणार आहे.कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आण‍ि काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. २० जिल्ह्यांतील एकूण २८० जागांसाठी मतदान झाले होते. त्यापैकी २७८ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. गुपकार आघाडीने यातील ११० जागा जिंकल्या आहेत. भाजपने ७५ तर काँग्रेसने २६ जागांवर विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे, अपक्षांनीही ४९ जागांवर बाजी मारली आहे. गुपकार आघाडीला काश्मीरमध्ये ८४ जागा जिंकून अपेक्षेप्रमाणे यश मिळाले आहे, परंतु हिंदुबहुल जम्मू प्रांतात आघाडीने ३५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने १० ठिकाणी विजय मिळविला आहे. दुसरीकडे भाजपला काश्मीर प्रांतात केवळ ३ जागा मिळाल्या आहेत.जम्मूमध्ये १४० जागांपैकी भाजपने ७२ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने १६ तर अपनी पार्टीने ३ जागा जिंकल्या आहेत. या एकूण निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. नॅशनल कॉन्फरन्सने ६७, पीडीपीने २७ आण‍ि काँग्रेसने २६ जागा जिंकल्या आहेत. (वृत्तसंस्था)

काश्मीरमध्ये आम्हाला समर्थन - ओमर अब्दुल्लाजम्मू प्रांतात गुपकार आघाडीने मिळविलेल्या विजयावरून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. जम्मू आण‍ि काश्मीरच्या जनतेने भाजपला उत्तर दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आम्हाला संपूर्ण जम्मू आण‍ि काश्मीरमध्ये समर्थन आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

फुटीरतावाद्यांना जनतेने दिले उत्तर - रविशंकर प्रसादभाजपला ४.५ लाख मते मिळाली असून, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आण‍ि काँग्रेसला मिळालेल्या मतांपक्षाही हा आकडा जास्त असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना जम्मू आणि काश्मीरच्या जनतेने मतदानातून उत्तर दिल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक