शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपदामुळे माझी अवस्था बांधून ठेवलेल्या पहिलवानासारखी गुलाबराव पाटलांची खंत : अजूनही मंत्री आहे असे वाटत नाही

By admin | Updated: August 7, 2016 21:52 IST

जळगाव : शिवसेनेतील ३० वर्षांची निष्ठा फळाला आली आणि आपल्याला मंत्रीपद मिळाले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात सहभाग घेतला. त्यावेळी सभागृहात बांधून ठेवलेल्या पहिलवानासारखे वाटत होते. अजूनही आपण मंत्री आहोत यावर विश्वास बसत नसल्याचे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेनेतर्फे जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी फटकेबाजी केली.

जळगाव : शिवसेनेतील ३० वर्षांची निष्ठा फळाला आली आणि आपल्याला मंत्रीपद मिळाले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात सहभाग घेतला. त्यावेळी सभागृहात बांधून ठेवलेल्या पहिलवानासारखे वाटत होते. अजूनही आपण मंत्री आहोत यावर विश्वास बसत नसल्याचे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेनेतर्फे जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी फटकेबाजी केली.
तर सभागृहाच्या चिंधडया उडविल्या असत्या
सहकार राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात सहभागी झालो. मात्र सभागृहात करमत नव्हते. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचारावरून सभागृहात गोंधळ सुरु झाला. शासनाचा मंत्री असल्याने आपण गप्प होतो. त्यावेळी मी मंत्री नसतो तर सभागृहाच्या चिंधडया उडविल्या असत्या. मात्र आता गुलाबराव पाटील म्हणजे शासन आहे. आणि माझं सरकार हे चांगल आहे. माझ्या सरकारची प्रत्येक योजना ही चांगली आहे, असे म्हणावे लागत आहे.
मंत्रीपदासाठी नाव निश्चित झाले आणि स्वत:ला चिमटा घेतला
मंत्रीमंडळ विस्ताराचे वारे सुरु झाले. ज्या दिवशी नाव निश्चित झाले त्या दिवशी संध्याकाळी ६.२० वाजता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा फोन आला. माझ्यासोबत माझे जालन्याचे मित्र होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली मुलाखत घेतली. तुमच्यावर गुन्हे आहेत. नुकतेच जेलमध्ये जाऊन आले, अशी विचारणा केली. वकिलांना बोलवून घेत संपूर्ण गुन्ह्यांबाबत शिवसेना पक्षप्रमुखांनी चर्चा केली. त्यानंतर रात्री ८.१५ वाजता मंत्रीपदासाठी नाव फायनल झाले. त्यानंतरही विश्वास बसत नसल्याने स्वत:लाचा चिमटा घेतला.