शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
4
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
5
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
6
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
7
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
8
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
9
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
10
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
11
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
12
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
13
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
14
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
15
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
16
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
17
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
18
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
19
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
20
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...

गुजरात पाणीप्रश्नी चर्चेचा ठराव आणू सभापतींचे निर्देश : जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

By admin | Updated: March 21, 2015 00:02 IST

नाशिक : महाराष्ट्र-गुजरात पाण्यासंबंधी विधान परिषदेत प्रस्ताव चर्चेला ठेवून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राला राहील असा ठराव आणावा, असे निर्देश विधान परिषद सभापतींनी सरकारला दिले.

नाशिक : महाराष्ट्र-गुजरात पाण्यासंबंधी विधान परिषदेत प्रस्ताव चर्चेला ठेवून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्राला राहील असा ठराव आणावा, असे निर्देश विधान परिषद सभापतींनी सरकारला दिले. आमदार जयंत जाधव यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली, त्यात म्हटले की, दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पातील २० टीएमसी. पाणी मुंबईला देऊन उर्वरित ६३ टीएमसी पाणी गुजरातला दिले जाणार असल्याची माहिती जानेवारीत उघडकीस आली. त्याच बरोबरच नारपार खोर्‍यातील महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रातील ३२ टीएमसी पाणी गुजरात कच्छ सौराष्ट्रामध्ये नेण्याचे गुजरात सरकार व केंद्र सरकारचे नियोजन असल्याचे समजते. सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष व संस्थांकडून नाशिकमध्ये आंदोलने केली गेली असून, दमणगंगा खोर्‍यातील उपलब्ध ८३ टीएमसी पाण्यापैकी १५ टक्के पाणी स्थानिक जनतेला राखीव ठेवून उर्वरित पाणी गोदावरी खोर्‍यात वळविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने केंद्र सरकारला सादर करावा, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. नार खोर्‍यातील उपलब्ध ५० टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यात वळविण्याचीही मागणी आहे. राज्य शासनाकडून महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील अतिरिक्त पाणी प्रवाही पद्धतीने मुकणे धरणातून नाशिक व मराठवाड्याला देणे शक्य असूनही शासनाकडून कार्यवाही केली जात नसल्याने शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली. त्यावर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महाराष्ट्राच्या हद्दीतील एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ दिले जाणार नाही त्यासाठी दमणगंगा खोर्‍यातील भुगड, खार्गीहील हे दोन धरणे बांधून ते बोगद्याद्वारे जोडून पिंजाळ धरणात आणले जाईल व त्यातून २० टीएमसी पाणी मुंबईला, तर १० टीएमसी पाणी वैतरणा धरणात व तेथून गोदावरी खोर्‍यात आणण्यात येईल, असे सांगितले. नार प्रकल्पातील २९ टीएमसी समुद्राला वाहून जाणारे पाणी ७०० मीटरपेक्षा अधिक उंचीवरून उचलून आणणे व्यवहार्य नसल्याने ते सरदार सरोवरात टाकले जाईल व स‘ाद्री रांगामधील ११ टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यात टाकावे आणि या राष्ट्रीय प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकारने करावा असा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. दमणगंगा तसेच नार-पार खोर्‍यातील पाणी वापराबाबत कोणताच करार झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांनी याप्रश्नी सभागृहात चर्चेचा प्रस्ताव आणावा, अशी मागणी केल्यावर या प्रश्नावर चर्चा घडवून ठराव करण्यात येईल, असे निर्देश सभापतींनी दिले.