शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कुटुंबात 12 सदस्य पण मिळालं फक्त एक मत; निकाल ऐकून उमेदवार ढसाढसा रडला, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 08:51 IST

सरपंच पदासाठी लढणाऱ्या एका उमेदवाराची जोरदार चर्चा रंगली आहे. संतोषभाई हलपती असं या उमेदवाराचं नाव असून त्याला फक्त एकच मत पडलं आहे.

नवी दिल्ली - गुजरातमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. एकूण 8686 पंचायतींसाठी निवडणूक झाली असून सर्व गावांमध्ये बॅलेट पेपरने मतदान करण्यात आलं. जवळपास 77 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. या निवडणुकीदरम्यान अनेक घटना या समोर आल्या आहेत. निवडणूक म्हटलं की कोणाचा तरी विजय आणि कोणाचा तरी पराभव होणार हे निश्चितच असतं. पण अनेकदा एका मताने देखील मोठा फरक पडत असतो. अशीच एक घटना आता गुजरातच्या वापीमध्ये घडली आहे. 

सरपंच पदासाठी लढणाऱ्या एका उमेदवाराची जोरदार चर्चा रंगली आहे. संतोषभाई हलपती असं या उमेदवाराचं नाव असून त्याला फक्त एकच मत पडलं आहे. विशेष म्हणजे त्याच्या घरातील 12 जणांनी मतदान केलं पण उमेदवाराला एकच मत पडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कुटुंबातील सदस्यांनी देखील पाठ फिरवल्याने, मत न दिल्याने संतोष अत्यंत भावूक झाले. निकाल ऐकल्यानंतर ते ढसाढसा रडायलाचं लागले. घरातील मंडळींनी साथ न दिल्याचं त्यांच्या खूपच मनाला लागलं. त्यामुळे सध्या संतोष यांना निवडणुकीत पडलेलं मत हा एकच गावात चर्चेचा विषय आहे.

कुटुंबीयांनीही फिरवली पाठ, दिली नाही साथ

रिपोर्टनुसार, गुजरातच्या वापी जिल्ह्यातील छरवाडा ग्रामपंचायतीच्या वॉर्ड नंबर 5 मध्ये सरपंच पदासाठी संतोष उभे राहिले होते. त्यांना किमान आपल्या घरातीस सदस्य तरी मतदान करतील अशी आशा होती. मात्र 12 सदस्य असले तरी फक्त एकच मत मिळालं. हे ऐकून संतोष इतके भावूक झाले की काऊंटिंग सेंटरवरच मोठमोठ्याने रडू लागले. माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही मला मत दिलं नाही असं म्हणत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. गुजरातमध्ये सरपंच पदासाठी तब्बल 27 हजार उमेदवार मैदानात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकGujaratगुजरात