शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ऑफिसमध्ये किस करणं वैयक्तिक अधिकार आहे की नाही?; हायकोर्टासमोर अजब खटला, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 16:41 IST

कोर्टात आजवर असे अनेक खटले दाखल झाले की ज्यावर निकाल देताना न्यायाधीशांसाठी खूप कठीण काम होऊन बसतं. पण गुजरात हायकोर्टासमोर असाच एक गुंतागुंतीचा आणि अजब खटला आला आहे.

कोर्टात आजवर असे अनेक खटले दाखल झाले की ज्यावर निकाल देताना न्यायाधीशांसाठी खूप कठीण काम होऊन बसतं. पण गुजरात हायकोर्टासमोर असाच एक गुंतागुंतीचा आणि अजब खटला आला आहे. खासगी कार्यालयामध्ये एखादं कपल किस करू शकतं की नाही? याचा निर्णय कोर्टाला द्यायचा आहे. एकाद्या खासगी कार्यालयामध्ये प्रेमी युगुलानं किस केलं तर तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे का? याचा निर्णय कोर्टाला घ्यायचा आहे. जर तो वैयक्तिक अधिकारात मोडत असेल मग कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसवणं आणि चित्रीकरणं करणं हे वैयक्तिक अधिकाराचा भंग करणं ठरणार नाही का? त्याबाबत एखादा व्यक्ती मानहानीचा दावा करू शकणार का? याबाबतही कोर्टाला निकाल द्यावा लागणार आहे. 

नेमकं प्रकरण काय?गुजरातच्या भावनगर येथील तांबोली कास्टिंग लिमिटेड कंपनीमध्ये व्हेनेझुएलाची एक इंजिनिअर काम करत होती. तिनं कंपनीचे संचालक वैभव तांबोली आणि त्यांचे वडील विपिन तांबोली यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ती आणि तिचा सहकारी कर्मचारी कार्यालयात एकमेकांना किस करत असतानाचं सीसीटीव्ही फुटेज हे दोघं पाहत असत आणि ते फुटेज त्यांनी व्हायरल केल्याचा आरोप तक्रारदार तरुणीनं केला आहे. 

संबंधित महिला कर्मचारी ज्या व्यक्तीला किस करत होती ती व्यक्ती देखील तांबोली परिवारातीलच सदस्य असून त्यांचं नाव मेहुल तांबोली असं आहे. मेहुल तांबोली यांचं त्याच्या कुटुंबियांसोबत भांडण सुरू असून कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये वैभव तांबोली यांनी मेहुल याच्यावर चाकूनं वार केल्याचाही दावा करण्यात आला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलच्या तक्रारदार महिलेनं अहमदाबादच्या वरतेज पोलीस ठाण्यात वैभव आणि विपिन तांबोली यांच्याविरोधात सीसीटीव्ही फुटेज लीक करण्याची तक्रार दाखल केली आहे. या दोघांवर आयपीसी ३५४ आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. 

तांबोली कुटुंबियांचं म्हणणं काय?पोलीस ठाण्यात एफआयर दाखल झाल्यानंतर वैभव तांबोली आणि त्यांच्या वडिलांनी वकिलाच्या माध्यमातून संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. तर वकील महेश जेठमलानी आणि अजय चोक्सी यांनी कोर्टात कलम ३५४ अंतर्गत किस करणं याचा वैयक्तिक अधिकारात समावेश होत नसल्याचा दावा केला आहे. यासोबतच जर कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे हे माहिती असतानाही तुम्हाला कुणी पाहत नाहीय असा  तुम्ही विचार करू शकत नाही, असंही तांबोली यांच्या वकिलांनी कोर्टासमोर म्हटलं आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालय