शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Riots: नरोडा हिंसाचार प्रकरणात माया कोडनानी, बाबू बजरंगी यांच्यासह सर्व 69 आरोपींची निर्दोष मुक्तता, 11 जणांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 20:00 IST

27 फेब्रुवारी 2002 रोजी अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला पेट्रोल ओतून गुजरातमधील गोध्रा येथे अनेक कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले होते. यानंतर, 28 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरात बंदची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, अहमदाबाद शहरासह संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या.

नरोडा येथील हिंसाचारप्रकरणी माजी मंत्री माया कोडनानी, बाबू बजरंगी, जयदीप पटेल यांच्यासह सर्व 69 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुजरातच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी (20 एप्रिल) याप्रकरणी निकाल दिला. या हत्याकांडात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला होता. 

तत्पूर्वी, 27 फेब्रुवारी 2002 रोजी अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला पेट्रोल ओतून गुजरातमधील गोध्रा येथे अनेक कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले होते. यानंतर, 28 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरात बंदची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, अहमदाबाद शहरासह संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या. या दंगलींमध्ये 28 फेब्रुवारी रोजी नरोडा गावात आणि बाहेर 11 जणांना जिवंत जाळण्यात आले होते.18 आरोपींचा झालाय मृत्यू - या खटल्यात भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांच्यासह एकूण 86 जण आरोपी होते. यांपैकी 18 जणांचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला. गोध्रा येथे जाळण्यात आलेल्या रेल्वेच्या बोगीत अयोध्येहून परतणाऱ्या एकूण 58 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. यानंतर 28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबाद शहरातील नरोडा गाव आणि परिसरात दंगल उसळली होती.या प्रकरणात, गृहमंत्री अमित शाह हे 2017 मध्ये कोडनानी यांच्या बचावासाठी साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर झाले होते. कोडनानी या 2002 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये मंत्री पदावर कार्यरत होत्या. याशिवाय, कोडनानी यांना नरोडा पाटिया दंगल प्रकरणातही दोषी ठरविण्यात आले होते. या दंगलीत एकूण 97 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यांना 28 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता.लावण्यात आली होती ही कलमे -नरोदा ग्राम प्रकरणात आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), 143 (बेकायदेशीर लोक जमवणे), 147 (दंगल), 148 (घातक शस्त्रांसह दंगल करणे), 120बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत खटला सुरू होता. 

टॅग्स :Gujaratगुजरात