शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

गुजरात दंगल सामूहिक बलात्कार; पुराव्याअभावी २६ आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 08:01 IST

जातीय दंगलींदरम्यान कलोलमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांचे प्रकरण

गोध्रा: गुजरातमधील एका न्यायालयाने २००२ मधील जातीय दंगलींदरम्यान कलोलमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या डझनभराहून अधिक सदस्यांची हत्या आणि सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपी असलेल्या सर्व २६ जणांना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे.

एकूण ३९ आरोपींपैकी १३ आरोपींचा खटला प्रलंबित असताना मृत्यू झाल्याने  त्यांच्यावरील खटला थांबवला. पंचमहाल जिल्ह्यातील हलोल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश लीलाभाई चुडासामा यांच्या न्यायालयाने शुक्रवारी पुराव्याअभावी खून, सामूहिक बलात्कार आणि दंगलीच्या गुन्ह्यातून २६ जणांची निर्दोष मुक्तता केली. गोध्रा येथे २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या साबरमती रेल्वे जाळण्याच्या घटनेनंतर १ मार्च २००२ रोजी उसळलेल्या जातीय दंगलीत हे आरोपी जमावाचे भाग होते. आरोपींविरुद्ध २ मार्च २००२ रोजी गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी पक्षाने आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ १९० साक्षीदार आणि ३३४ कागदोपत्री पुरावे तपासले, परंतु न्यायालयाने सांगितले की साक्षीदारांच्या जबाबात विरोधाभास आहेत आणि त्यांनी फिर्यादीच्या युक्तिवादाचे समर्थन केले नाही.

एन्काऊंटर प्रकरणात ३६ आरोपी निर्दोष

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्हा न्यायालयाने चार जणांच्या एन्काऊंटरशी संबंधित २५ वर्षे जुन्या प्रकरणात ३४ पोलिस कर्मचाऱ्यांसह ३६ जणांची  संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली. ऑक्टोबर १९९८ मध्ये पोलिसांनी दावा केला होता की, दरोड्यासाठी जाणारे धनंजय सिंग यांच्यासह चौघांना ठार मारले होते. नंतर निष्पन्न झाले की, धनंजयसारखीच एक व्यक्ती चकमकीत मारली गेली आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातCourtन्यायालय