शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

LIVE - गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपले, 176 आमदारांनी केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 15:24 IST

 गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झालेले मतदान संपले आहे.

गांधीनगर, दि. 8 -  गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झालेले मतदान संपले आहे. सर्व 176 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती राज्य निवडणूक अधिका-यांनी दिली.  दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. संध्याकाळी पाचवाजता मतमोजणी सुरु होईल. संध्याकाळी सहावाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. 

या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व नेते अहमद पटेल यांच्यासहीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व बलवंत सिंह राजपूत यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.  काहीही झाले तरी अहमद पटेल यांचा विजय होऊ द्यायचा नाही, असा निश्चय केलेल्या भाजपाने त्यांच्याविरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखून वर्षअखेरीस होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याची भाजपाची रणनीती आहे. 

केंद्रातील सत्ताधारी भाजपाने येथे राज्यसभेच्या तीन जागांसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी व बलंवत सिंह राजपूत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. बलवंत सिंह राजपूत यांनी अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. शाह व इराणी यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र राजपूत यांना जिंकवण्यासाठी व पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजपाला अतिरिक्त मतं मिळवणे गरजेचं आहे. दरम्यान,  पटेल यांनी बंगळुरुहून परतलेल्या आमदारांची भेट घेतली व यानंतर स्वतःच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना पटेल म्हणालेत की, ''मला माझ्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. काँग्रेसच्या 44 आमदारांव्यतिरिक्त जदयूचा एक व राकांपाचे दोन आमदार माझ्यासाठी मतदान करतील.'' अहमद पटेल यांना विजयासाठी 45 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 57 वरुन 51 वर आले आहे. 

दरम्यान, बंळगुरूहून परतल्यानंतर या आमदारांना आनंद जिल्ह्यातील नीजानंद रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. आता हे सर्व आमदार गांधीनगरकडे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले आहेत.