शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीचं गुजरात मॉडेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच देण्यासाठी दिली EMI सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 17:01 IST

Bribe Case News: मागच्या काही वर्षांमध्ये विकासाच्या गुजरात मॉडेलची खूप चर्चा झालीय. गुजरातमधील विकासाची जाहिरात त्या माध्यमातून देशभरात करण्यात आली. मात्र सध्या गुजरातमधील एक मॉडेल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

मागच्या काही वर्षांमध्ये विकासाच्या गुजरात मॉडेलची खूप चर्चा झालीय. गुजरातमधील विकासाची जाहिरात त्या माध्यमातून देशभरात करण्यात आली. मात्र सध्या गुजरातमधील एक मॉडेल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र हे मॉडेल विकासाचं नसून लाचखोरीचं आहे. भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी लाचेची देवाण घेवाण करणयासाठी EMI व्यवस्था लागू  केली आहे. या माध्यमातून विविध कामांसाठी लाच देणाऱ्यांना EMIची सुविधा देण्यात येत आहे. 

काही भ्रष्ट अधिकारी हे लाच घेण्यासाठी EMIची सुविधा देत आहेत, असं सांगितल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र सध्या गुजरातमध्ये लाचखोरीचं हे EMI मॉडेल खूप प्रचलित होत आहे. दरम्यान, गुजरातमध्ये यावर्षी EMI च्या माध्यमातून लाच घेण्याची १० प्रकरणं समोर आली आहे. 

गुजरातमधील काही भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी लाच घेण्यासाठीचा हा हटके फॉर्म्युला अमलात आणला आहे. तसेच लाच देताना कुणावर आर्थिक भार पडू नये म्हणून ही लाच सुलभ हप्त्याने देण्याची सोय करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सुविधेचा लाभ घेऊन लोक लाचही देत आहे. एसीबीने लाचखोरीच्या या प्रकाराची १० प्रकरणं समोर आणली आहेत.   

याबाबत गुजरातमधील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत अशी १० प्रकरणं समोर आली आहेत. मार्च महिन्यात जीएसटीच्या एका बनावटी बिल घोटाळ्यामध्ये एका व्यक्तीकडे २१ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यामध्ये २ लाख रुपयांच्या १० हप्त्यांमध्ये लाच देण्याची सवलत देण्यात आली होती. त्यामुळे लाच देणाऱ्यालाही फार झाला नसता. तसेच घेणाऱ्या अधिकाऱ्यांनाही पूर्ण पैसे मिळाले असते. दरम्यान, या लाचखोरांनी एका शेतकऱ्याकडेही मोठ्या रकमेच्या लाचेची मागणी केली होती. मात्र त्याची परिस्थिती पाहून त्याला हप्त्यांमध्ये लाच देण्याची सवलत दिली होती. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCorruptionभ्रष्टाचारGujaratगुजरात