शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना विष पाजा, वाचल्यास शंकराचे अवतार, गुजरातच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 18:59 IST

येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रंगत चढली असून, अनेक नेते वादग्रस्त विधान करत सुटले आहेत.

नवी दिल्ली- येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रंगत चढली असून, अनेक नेते वादग्रस्त विधान करत सुटले आहेत. मोदी मोदी जप करणाऱ्यांच्या कानशिलात लगावा, अशा विधानानंतर गुजरातच्या रुपाणी सरकारमध्ये मंत्री असलेल्या गणपत वसावा यांनीही वादग्रस्त विधान केलं आहे.ते म्हणाले राहुल गांधींना विष पाजा, वाचल्यास शंकराचे अवतार समजू. सोशल मीडियावरून त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. रुपाणी सरकारमध्ये वने आणि पर्यावरण मंत्री असलेल्या गणपत वसावा यांनी राहुल गांधींसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. वसावा यांनी सोशल मीडियावर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा हवाला देत सांगितलं की, राहुल गांधींना भगवान शंकरासारखं विष दिलं पाहिजे. विष पाजल्यानंतर ते निवडणुकीपर्यंत जिवंत राहतात की नाही ते पाहू.खरं तर वसावा यांनी राहुल गांधींची शंकराशी तुलना करणाऱ्या त्या काँग्रेसच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी हे भगवान शंकराचे अवतार असल्याचं सोशल मीडियावरून काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं म्हटलं होतं. त्याचाच हवाला देत गणपत वसावा म्हणाले, राहुल गांधी भगवान शंकराचे अवतार आहेत. तुम्ही सेना आणि जवानांकडे पाकिस्तानच्या हल्ल्याचे पुरावे मागत आहात. तर दुसरीकडे तुम्ही राहुल गांधींना साक्षात शिवाचे अवतार असल्याचं सांगत आहात. भगवान शंकर लोकांचं दुःख दूर करण्यासाठी विष प्यायचे, तुमच्या नेत्यालाही 500 ग्राम विष पाजा, निवडणुकीपर्यंत जिवंत राहिल्यास शिवाचे अवतार समजू. 

दुसरीकडे कालच कर्नाटकातील एका जनसभेला संबोधित करताना शिवालिंग गौडा म्हणाले, मोदी मोदीच्या घोषणा देणाऱ्यांच्या कानशिलात लगावा. मोदींनी जशी आश्वासनं दिली होती, तसे कोणाच्या खात्यात आतापर्यंत 15 लाख आले आहेत काय?, जो कोणी भाजपा नेता प्रचारादरम्यान तुमच्याजवळ येईल त्याला पहिला प्रश्न हा विचारा. भाजपा प्रवक्ते आणि आमदार सुरेश कुमार यांनी शिवालिंग गौडा यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujaratगुजरात