शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारनं बुलेट ट्रेन प्रकल्प रोखला; मोदी सरकारनं वेगळा मार्ग काढला; 'प्लान बी' तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 09:03 IST

Mumbai - Ahmedabad Bullet Train project: महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहणाचा वेग कमी; नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड वेगळ्या विचारात

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai - Ahmedabad Bullet Train project) धावण्यास उशीर होणार आहे. कोरोनाचं संकट आणि ठाकरे सरकारनं प्रकल्पाबद्दल घेतलेली भूमिका यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग कमी झाला आहे. मात्र ठरल्याप्रमाणे बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) प्रयत्नशील आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचं अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. महाराष्ट्रात अधिग्रहणाचा वेग अतिशय कमी आहे. पुढील ३ महिन्यांत अपेक्षित जमिनीचं अधिग्रहण न झाल्यास बुलेट ट्रेनची गुजरातमधील सेवा आधी सुरू होईल.बुलेट ट्रेन कधी सुरू होणार? रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी दिले 'हे' उत्तर; म्हणाले...मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पण राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पाचा वेग मंदावला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या अधिग्रहणाचा वेग मंदावला आहे. पुढील  तीन महिन्यांत अधिग्रहणानं वेग न घेतल्यास आधी गुजरातच्या हद्दीत येणारी बुलेट ट्रेन धावेल, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिली आहे.समृद्धी महामार्गालगत नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा प्रस्तावमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनलाठी २०२३ ची डेडलाईन ठेवण्यात आली होती. पण कोरोनामुळे वर्ष वाया गेल्यानं आता हा प्रकल्प पूर्ण होण्यास २०२४ वर्ष उजाडेल, अशी माहिती माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी दिली. 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी ३५२ किलोमीटर प्रकल्प गुजरातमध्ये आहे. यातल्या ९५ टक्के जमिनीचं अधिग्रहण पूर्ण झालं आहे. पण महाराष्ट्रातल्या १५६ किलोमीटरपैकी केवळ २३ टक्के जमिनीचं अधिग्रहण पूर्ण करण्यात यश आलं आहे,' अशी आकडेवारी खरे यांनी दिली.'गुजरातमधील उर्वरित ५ टक्के जमीन जूनच्या मध्यापर्यंत अधिगृहित केली जाईल. पुढील तीन महिन्यांत ७० ते ८० टक्के जमीन अधिगृहित झाल्यास नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला पूर्ण प्रकल्प एकाचवेळी सुरू करता येईल. पण महाराष्ट्रातील जमिनीचं अधिग्रहण करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता जपानी कंपनीसोबत बोलणी सुरू आहे. महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहण रखडल्यानं केवळ गुजरातमध्ये बुलेट ट्रेन सुरू करण्याचा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचा मानस आहे', असं खरे यांनी सांगितलं. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानकं असणार आहेत. यातील ८ स्थानकं गुजरात, तर ४ स्थानकं महाराष्ट्रात असतील.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNarendra Modiनरेंद्र मोदी