शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान जेष्ठ वकील पित होते बिअर; Video Viral होताच न्यायमूर्तींनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:06 IST

गुजरात हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान एक जेष्ठ वकील बिअर पीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Gujarat High Court: कोर्टाने खटल्यांचे लवकर निवारण व्हावं आणि न्यायालयीन कामात त्रास कमी व्हावा यासाठी ऑनलईन सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र लोक या प्रक्रियेचा वाट्टेल तसा वापर करत आहेत. ऑनलाईन सुनावणीच्या प्रक्रियेचा लोक चुकीचा फायदा घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी गुजरात हायकोर्टातील ऑनलाईन सुनावणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामुळे एक व्यक्ती चक्क कमोडवर बसून सुनावणीसाठी हजर झाला होता. या सगळ्या प्रकाराने न्यायालयाची प्रतिष्ठाच दुखावली गेली होती. त्यानंतर आता गुजरात हायकोर्टाच्याच आणखी एका सुनावणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक जेष्ठ वकील सुनावणी सुरु असताना बिअर पिताना दिसत आहेत.

गुजरात हायकोर्टात एका प्रकरणाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान एका ज्येष्ठ वकिल न्यायाधीशांसमोर बिअर पित असल्याचे समोर आलं आले. ज्यामुळे न्यायाधीश संतापले आणि त्यांनी वकिलाविरुद्ध स्वतःहून दखल घेण्याचा निर्णय घेतला. या खटल्याच्या ऑनलाइन सुनावणीला जेष्ठ वकिल बिअर पिऊन मोबाईलवर बोलत असल्याचे दिसून आले. न्यायालयाला त्यांचे कृत्य आवडले नाही. न्यायालयाने या वकिलाविरुद्ध अवमान केल्याची ​​कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

गुजरात हायकोर्टात २६ जून रोजी न्यायमूर्ती संदीप भट्ट यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू होती. या दरम्यान ज्येष्ठ वकील भास्कर तन्ना व्हर्च्युअली सामील झाले. कॅमेरा चालू होता आणि सुनावणी सुरू होती. भास्कर तन्ना हे प्रत्यक्ष कोर्टाच्या खोलीत उपस्थित नसल्याने, ते ऑनलाइन हजर आहेत हे विसरले असावे. लाईव्ह सुनावणीदरम्यान, वकील साहेबांनी बिअर पिऊन त्यांची तहान भागवण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर बिअर पिताना भास्कर तन्ना हे  फोनवरही बोलत होते. त्यांचे हे कृत्य रेकॉर्ड करण्यात आले. त्यांची ही क्लिप सोशल मीडियावरही व्हायरल झाली.

या सगळ्या प्रकारानंतर १ जुलै रोजी न्यायमूर्ती ए.एस. सुपेहिया आणि न्यायमूर्ती आर.टी. वाच्छानी यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. न्यायमूर्तींनी तन्नांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्टाने हे कृत्य अपमानजनक आणि घृणास्पद असल्याचे म्हटलं.

"व्हायरल झालेल्या हायकोर्टाच्या कामकाजाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये सुनावणीला उपस्थित राहताना फोनवर बोलणे आणि बिअरच्या मगमधून मद्यपान करणे हा अपमान आहे. तन्नांचे हे वर्तन न्यायालयाने त्यांना दिलेल्या वरिष्ठ वकिलाच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन करते. आमच्या मते, त्यांचे पद रद्द केले पाहिजे," असं न्यायमूर्ती ए.एस. सुपेहिया म्हणाले.

दरम्यान, हायकोर्टाने तन्ना यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. त्यांना खंडपीठासमोर व्हर्च्युअल पद्धतीने हजर राहण्यासही मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी होईल असे कोर्टाने म्हटले. 

टॅग्स :GujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालय