शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले; मतदान १ व ५ डिसेंबर रोजी २ टप्प्यांत, निकाल ८ डिसेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 06:16 IST

आयोगाने १४ ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर केली होती; पण गुजरातची निवडणूक जाहीर करण्याचे टाळले होते.

नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. या निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून, हिमाचल प्रदेशसोबत ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुरुवारी केली.  

आयोगाने १४ ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर केली होती; पण गुजरातची निवडणूक जाहीर करण्याचे टाळले होते. गुजरात निवडणुकीच्या घोषणेला विलंब झाल्याबद्दल विरोधकांकडून होणारी पक्षपातीपणाची टीका आयोगाने फेटाळली आहे. गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे. असे असताना ११० दिवस अगोदरच निवडणुका जाहीर झाल्याचे आयोगाने स्पष्ट केले. राज्यात माेरबी येथे दुर्घटना घडल्याने तसे होऊ शकले नाही, असे राजीव कुमार म्हणाले.

४ कोटींवर मतदारगुजरातमध्ये एकूण ४.९ कोटी पात्र मतदार आहेत. ४.६ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. निवडणुकीसाठी ग्रामीण भागात ३४,२७६ व शहरी भागात १७,५०६ अशी एकूण ५१,७८२ मतदान केंद्रे असतील. 

निवडणुकीचा कार्यक्रम पहिला टप्पा     दुसरा टप्पा अधिसूचना जारी     ५  नोव्हेंबर     १० नोव्हेंबरला अर्ज भरणे     १४ नोव्हेंबर     १७ नोव्हेंबरअर्जांची छाननी    १५ नोव्हेंबर    १८ नोव्हेंबर अर्ज मागे घेणे     १७ नोव्हेंबर    २१ नोव्हेंबरमतदान      १ डिसेंबर    ५ डिसेंबर जागा    ८९     ९३ 

टॅग्स :Gujaratगुजरात