शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गुजरातमध्ये भाजपाचा फ्लॉप शो सुरूच, मोदींनंतर मुख्यमंत्र्यांच्या रॅलीतही सन्नाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 17:56 IST

गुजरातमध्ये खुद्द पंतप्रधानांच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

राजकोट: गुजरातमध्ये खुद्द पंतप्रधानांच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. रूपाणी यांच्या स्कूटर रॅलीमध्ये अत्यंत कमी गर्दी असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही स्कूटर रॅली फ्लॉप झाल्यामुळे सोशल मीडियावर त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे. आम आदमी पक्षाचे माजी नेता आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 

हा व्हिडीओ शेअर करताना भूषण यांनी, ''गुजरात मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची राजकोटमधील स्कूटर रॅली...व्हिडीओ पाहून ते आमची स्थिती खराब आहे असं का म्हणतात हे समजू शकतो'' असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी विजय रूपाणी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्यामध्ये ते स्थिती खराब असल्याचं म्हणतात, त्यावरून भूषण यांनी खोचक टीका केली आहे.  

व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री रूपाणी एका स्कूटरच्या मागच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. त्यांनी हेल्मेट घातलेलं नाही, शिवाय रॅलीमध्ये अर्ध्याहून अधिक लोकांनी हेल्मेट घातलेलं नाही. रॅलीमध्ये जवळपास केवळ 25 स्कूटर दिसत आहेत, याशिवाय बरेच सुरक्षारक्षक मुख्यमंत्र्यांच्या स्कूटरसोबत धावताना दिसत आहेत. 23 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये केवळ 50 च्या आसपास लोक दिसत आहेत.  

ऑडिओ क्लिपमध्ये रूपाणी म्हणतात, स्थिती खराब -काही दिवसांपूर्वी विजय रूपाणी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओत रूपाणी सुरेंद्रनगर येथील नरेश संगीतम यांच्याशी चर्चा करत आहेत. माझी स्थिती खराब आहे असं रूपाणी या ऑडिओत बोलत आहेत. ऑडिओमध्ये रूपाणी म्हणतायेत... सध्या देशात मी एकटाच जैन मुख्यमंत्री आहे. मला नरेंद्र भाईंचा फोन आला होता, केवळ 5 टक्के जैन समाज असतानाही आम्ही जैन मुख्यमंत्री बनवला असं रूपाणी बोलत आहेत. या दरम्यान, रूपाणी हे नरेश संगीतम यांना सुरेंद्रनगरमध्ये जैनांची समजूत काढली का? असं विचारत आहेत. 

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदी