शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये निवडणूकपूर्व धमाक्याला सुरुवात, शिक्षकांना पगारवाढ; पालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग होणार लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 02:06 IST

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने शिक्षक आणि नगरपालिकेतील कर्मचा-यांसह अन्य कर्मचा-यांना वेतनवाढ देण्याची घोषणा करून निवडणूक भेट दिली आहे.

अहमदाबाद : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने शिक्षक आणि नगरपालिकेतील कर्मचा-यांसह अन्य कर्मचा-यांना वेतनवाढ देण्याची घोषणा करून निवडणूक भेट दिली आहे.अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना मिळणा-या निश्चित वेतनात घसघशीत वाढ होणार असून, राज्यातील १०५ नगरपालिकेच्या कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे.‘मा-वात्सल्य’ योजनेखालील गंभीर आजारासाठी मोफत वैद्यकीय उपचारासाठीची उत्पन्नाची मर्यादा वार्षिक १.५० लाख रुपयांवरून २.५० लाख रुपये केली आहे. मा-वात्सल्य योजनेचा अधिक लोकांना लाभ मिळावा म्हणून आम्ही उत्पन्न मर्यादा २.५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी गांधीनगर येथे पत्रकारांना सांगितले.माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे मासिक वेतनही १६,५०० रुपयांवरून २५,००० रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे सांगून नितीन पटेल म्हणाले की, सहायक शिक्षकांनाही दरमहा १०,५०० रुपयांऐवजी आता १६,२२४ रुपये वेतन मिळेल. प्रशासकीय सहायकांनाही ११,५०० रुपयांऐवजी आता दरमहा १९,९५० रुपये वेतन मिळेल. शासकीय अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व प्रशासकीय कर्मचाºयांच्या वेतनात अशीच वाढण्यात करण्यास मंजुरी देण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले.नितीन पटेल यांच्याकडे अर्थखातेही आहे. नगरपालिकेच्या जवळपास १५,००० कर्मचाºयांनाही वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)१५ हजार कर्मचा-यांना मिळणार फायदा१०५ स्थानिक संस्थांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची परवानगी देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील १६२ नगरपालिकांपैकी १०५ नगरपालिका आपल्या कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देतात.या कर्मचा-यांच्या मागणीवर विचार करून आम्ही १०५ नगरपालिकेच्या कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याची मंजुरी दिली आहे. जवळपास १५,००० कर्मचा-यांना या वेतनवाढीचा लाभ मिळेल, असेही पटेल यांनी सांगितले. 

टॅग्स :GujaratगुजरातElectionनिवडणूक