शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

गुजरात विधानसभा निवडणूक : कुतियानामध्ये चर्चा बाहुबली उमेदवाराची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:51 IST

हा गुजरातमधील असा एक मतदारसंघ आहे, जिथे ना चर्चा आहे भाजपाची ना काँग्रेसची. तिथे केवळ चर्चा आहे, बाहुबली नेता कंधल सरनमभाई जडेजा याची. हे जडेजा २0१२ साली राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून विधानसभेवर निवडून आले होते.

- विकास मिश्र

कुतियाना : हा गुजरातमधील असा एक मतदारसंघ आहे, जिथे ना चर्चा आहे भाजपाची ना काँग्रेसची. तिथे केवळ चर्चा आहे, बाहुबली नेता कंधल सरनमभाई जडेजा याची. हे जडेजा २0१२ साली राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून विधानसभेवर निवडून आले होते.अर्थात त्यांना रोखणार तरी कोण? इथे केवळ त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचाच बोलबाला आहे. त्यांची आई आणि गुजरातची डॉन संतोकबेन आता या जगात नाहीत. पण जाताना त्यांनी जणू आपली सारी ताकद कंधललाच दिली आहे. कंधल जडेजाचे वडील सरनमभाई एक मिल मजदूर होते. पण एका हत्याकांडामुळे ते बाहुबली बनले. नंतर त्यांचीही हत्या झाली. त्यावेळी संतोकबेन गृहिणी होत्या. पण १९८६ साली पतीची हत्या झाल्याने त्या भयंकर संतापल्या आणि तेव्हापासून पोरबंदरमध्ये त्यांचे (गैर)शासन सुरू झाले. त्या १९९0 व १९९५ साली कुतियानामधून निवडूनही आल्या. त्यांच्यावर एक चित्रपटही बनला होता आणि संतोकबेनची भूमिका शबाना आझमी यांनी केली होती. कंधल आईसारखे मोठा डॉन बनू शकले नाहीत, पण लोकच त्यांना बाहुबली मानत आहेत. त्यांनीही तुरुंगाची हवा खाल्ली आहे. त्यांनी २0१२ साली भाजपाचे करसनभाईना १९ हजार मतांनी पराभूत केले होते आणि यंदाही त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कांग्रेसचे वेजरभाई मोडेदरा व भाजपाचे लखमण ओडेदरा मैदानात आहेत.अंबानींच्या गावात काँग्रेसची हवामंगरोल मतदारसंघातील बाजारात थांबलो असताना चहाच्या टपरीवर निवडणुकीची चर्चा सुरू झाली. या गावाचे नाव काय, असा प्रश्न विचारताच, सुरेशभाई नावाचे गृहस्थ उत्तरले की, हे चोरवाड आहे. चोरवाड म्हणजे धीरूभाई अंबानी यांचे गाव. कधीकधी कोकिळाबेन अंबानी इथे येतात, असेही समजले. गावात कोणत्या पक्षाचा जोर आहे, असा सवाल करताच, तिथे काँग्रेसचाच बोलबाला असल्याचे जाणवले.पाच वर्षांत संपत्ती चौपटपोरबंदरमध्ये काँग्रेसचे अर्जुनभाई मोडवादिया यांची जोरात चर्चा आहे. ते सलग दोनदा पराभूत झाले. तरीही त्यांची मालमत्ता प्रचंड वाढली आहे.निवडणूक आयोगापुढे २00७ साली त्यांनी आपली संपत्ती १ कोटी रुपये असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २0१२ साली ती ४ कोटी झाली आणि आता २0१७ साली ती आणखी वाढली आहे.ती किती वाढली, यातच मतदारांना रस दिसत आहे. त्यांच्याविरोधात भाजपाचे बाबूभाई बोखारिया मैदानात आहेत. पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्यासाठी अर्जुनभाई प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017