शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान, अनेक ठिकाणी ईव्हीएमविषयी तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:23 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत शनिवारी ६८ टक्के मतदान झाले असून, त्याचा फायदा काँग्रेसला होतो की भाजपाला मिळतो, याची उत्सुकता आहे.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत शनिवारी ६८ टक्के मतदान झाले असून, त्याचा फायदा काँग्रेसला होतो की भाजपाला मिळतो, याची उत्सुकता आहे. याआधी २0१२ च्या निवडणुकीत ७0.७४ टक्के मतदान झाले होते.मात्र सुरुवातीच्या काही तासांतच मतदान यंत्रांबाबत अनेक तक्रारी आल्या. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, तर काही ठिकाणी छेडछाडीच्या तक्रारी मतदारांनी केल्या. अशा शंभरहून अधिक तक्रारी आल्या.पोरबंदर येथील काँग्रेस उमेदवार अर्जुन मोधवाडिया यांनी ईव्हीएम ब्ल्यूटूथला जोडून हेराफेरी होत असल्याचा आरोप केला. यांनी निवडणूक आयोगाकडेही तशी तक्रार केली. सर्व ईव्हीएम ब्ल्यूटूथद्वारे तीन मोबाइलला जोडण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला. गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी बी. बी. स्वाइन यांनी सांगितले की, अर्जुन मोधवाडिया यांच्या तक्रारीनंतर तपासणीचे आदेश दिले आहेत.मांडवीत काँग्रेस उमेदवार शक्तीसिंग गोहिल यांनीही ईव्हीएममधील बिघाडाच्या तक्रारी केल्या आहेत. ते म्हणाले, अनेक ठिकाणी ईव्हीएम योग्य प्रकारे काम करीत नसल्याच्या तक्रारी आल्या. जेतपूर मतदारसंघातील एका केंद्रात ईव्हीएम बिघाडामुळे मतदान १५ मिनिटे थांबवण्यात आले. राजकोट जिल्ह्यात ३३ ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या.मोदी-राहुल गांधी यांची परीक्षाया निवडणुका म्हणजे लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाºया निवडणुकांची चाचणी मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. काँग्रेसचे अध्यक्ष होत असलेल्या राहुल गांधी यांच्यासाठी ही नेतृत्वाची परीक्षा आहे. मोदी यांनी सौराष्ट्र व दक्षिण गुजरातेत १५ सभा घेतल्या, राहुल गांधी सात दिवस राज्यात होते आणि अनेक सभांत भाषणे केली.आज अनेक ठिकाणी विवाहसोहळे होते. त्यामुळे वधू-वर नटूनथटून मतदानाला आले होते. राजकोटमध्ये ११५ वर्षे वयाच्या महिलेने मतदान केले. उमेदवार व नेत्यांनी दुपारपर्यंत मतदान केले होते. मुख्यमंत्री विजय रुपानी, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार इंद्रनील राजगुरू, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघाणी, क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा यांनी लवकरच मतदान केले. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री विजय रुपानी, काँग्रेसचे शक्तिसिंह गोहिल आणि परेश धनानी हे रिंगणात आहेत.68% मतदानाचा फायदा भाजपाला की काँग्रेसला?सौराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील ८९ जागांसाठी ९७७ उमेदवार रिंगणात. भाजपाने २०१२ मध्ये यातील ६३ जागा व काँग्रेसने २२ जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017ElectionनिवडणूकGujaratगुजरात