शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Assembly Election 2022 : नरेंद्र मोदींचा झंझावाती दौरा, आज सौराष्ट्रात 4 सभांना संबोधित करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 11:29 IST

Gujarat Assembly Election 2022 : नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दक्षिण गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात एका सभेला संबोधित केले.

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदीगुजरातच्या सौराष्ट्रमध्ये विधानसभा निवडणूक प्रचार दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चार जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. आज सकाळी नरेंद्र मोदी सोमनाथ मंदिरात पूजा केली. त्यानंतर आता गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ शहरात सभेला संबोधित करणार आहेत. भाजपच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, वेरावळनंतर नरेंद्र मोदी सत्ताधारी भाजपच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून दुसर्‍या निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी राजकोट जिल्ह्यातील धोराजीला रवाना होतील. यानंतर नरेंद्र मोदी यांचा अमरेली आणि बोटाडमध्ये सभांना संबोधित करण्याचा कार्यक्रम आहे.

नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दक्षिण गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात एका सभेला संबोधित केले. या जाहीर सभेत त्यांनी गुजराती अभिमान जपण्याचे आवाहन करत गुजरातची बदनामी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. अशा लोकांना राज्यात स्थान मिळू नये, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. विशेष म्हणजे यावेळच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक निवडणूक प्रचार सभांमध्ये गुजरातच्या अभिमानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. गुजरातच्या मॉडेलला बदनाम करणार्‍यांची टोळी सक्रीय झाली आहे, असे अनेक प्रसंगी नरेंद्र मोदी म्हणाले. मात्र, यासाठी त्यांनी आतापर्यंत थेट कोणत्याही पक्षाचे नाव घेण्याचे टाळले आहे.

गेल्या दोन दशकात जनतेच्या सहकार्याने नवा गुजरात बनवल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, गुजरातची जनता आता त्यांची मेहनत वाया घालवणार नाही. भाजपला पुन्हा एकदा विजयी करा. जेणेकरून दुहेरी इंजिन असलेले सरकार गुजरातचा विकास सातत्याने पुढे नेऊ शकेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यासाठी भाजपने देशातील आणि राज्य पातळीवरील सर्व दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लावले आहे. 

गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदानगुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, भाजप सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर, काँग्रेस आणि आपही भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022GujaratगुजरातElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी