शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

आधी PM मोदींवर टीका, आता त्यांच्या वृद्ध आईविषयी आक्षेपार्ह शब्द; इटालियाचा नवीन व्हिडिओ समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 19:40 IST

गुजरातचे आप प्रमुख गोपाल इटालियाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ते मोदींच्या वृद्ध आईविषयी बोलत आहेत.

नवी दिल्ली: गुजरातमधील आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख गोपाल इटालिया यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू असतानाच त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पंतप्रधान मोदींना 'नीच माणूस' म्हटल्यामुळे गुरुवारी दिल्लीत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातच आता गोपाल इटालियाने पंतप्रधान मोदींच्या आईबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये इटालियाने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना 'नीच' म्हटले आणि त्यांची आई हीराबेन यांना 'नौटंकीबाज' म्हटले आहे. हा व्हिडिओ शेअर करत भाजप नेते अमित मालवीय यांनी जोरदार हल्ला चढवला.

आठवडाभरात भाजपने इटालियाचा तिसरा व्हिडिओ समोर आणला आहे. याआधी एका व्हिडीओमध्ये इटालियाने पीएम मोदींना 'नीच टाईप मॅन' म्हटले होते. यानंतर, दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी मंदिर आणि कथांना शोषणाचा अड्डा असल्याचे सांगून महिलांना तेथे न जाण्याचा सल्ला दिला होता. आता तिसऱ्या व्हिडिओत इटालियाने मोदींच्या आईविषयी आक्षेपार्ह शब्द वापरला आहे. या व्हिडिओंद्वारे भाजप 'आप'ला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. इटालियाला राष्ट्रीय महिला आयोगाने बोलावले होते. बुधवारी आयोगाच्या कार्यालयात गोंधळ झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी इटालियाला थोड्यावेळासाठी ताब्यात घेतले. भाजप नेते अमित मालवीय यांनी गोपाल इटालियाचा नवीन व्हिडिओ शेअर करत लिहिले, "गुजरातमधीलआप प्रमुख आणि केजरीवाल यांच्या जवळचे, गोपाल इटालिया एकामागून एक गुन्हे करतात आणि महिलांचा अपमान करतात. महिलांना 'सी' शब्दाने संबोधित करतात, त्यांना मंदिरात न जाण्याचा सल्ला देतात. त्यानंतर आता पंतप्रधानांच्या वृद्ध आईला नौटंकीबाज म्हणतात.''

स्मृती इराणींचाही हल्लाबोलकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही इटालियाच्या व्हिडिओवरून मोठा हल्ला चढवला आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. स्मृती यांनी ट्विट केले की, 'अरविंद केजरीवाल, गटारीचे तोंड असलेल्या गोपाल इटालिया ने तुमच्या आशीर्वादाने पीएम मोदींच्या आईला शिवीगाळ केली आहे. मी कोणतीही नाराजी व्यक्त करणार नाही. पण, गुजरातची जनता तुम्हाला पाहून घेईल.'' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAAPआपGujaratगुजरातElectionनिवडणूक