शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! १३ वर्षांचा मुलगा वेदनेने तडफडत राहिला, उपचाराअभावी हार्ट अटॅकने झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:21 IST

सुरतजवळील नवसारी जिल्ह्यात असलेल्या तपोवन संस्कार धाममध्ये शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

गुजरातमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुरतजवळील नवसारी जिल्ह्यात असलेल्या तपोवन संस्कार धाममध्ये शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. महाराष्ट्रातील रहिवासी मेघ जैन हा तीन वर्षांपासून तपोवन संस्कार धाममध्ये शिक्षण घेत होता. हार्ट अटॅक येण्यापूर्वी विद्यार्थ्याच्या छातीत दुखत होतं पण त्याचा जीव वाचवता आला नाही. तो वेदनेने तडफडत राहिला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाली आहे. 

२५ मे रोजी रात्री तपोवन संस्कार धाममध्ये मुलासोबत धक्कादायक घटना घडली आहे. मेघ जैनचं कुटुंब महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राहतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसून आलं आहे की, विद्यार्थ्याला वेदना होत होत्या आणि घटनास्थळी उपस्थित असलेला वसतिगृहातील स्टाफ त्याच्यासोबत जवळच बसून राहिला. 

प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की स्टाफला वाटलं की, मुलाच्या छातीत दुखणं हे गॅस आणि अ‍ॅसिडिटीमुळे होत असेल. यामुळे त्यांनी विशेष लक्ष दिलं नाही. आश्रम व्यवस्थापनाने निष्काळजीपण दाखवणाऱ्या सहाय्यकाला निलंबित केलं आहे. हार्ट अटॅकमुळे जीव गमावलेला मेघ जैन हा तपोवन संस्कार धाम येथे नववीत शिकत होता. त्याच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

मेघ जैनचे वडील सचिन भन्साळी आणि काका अतुल भन्साळी हे मूळचे खेतियाचे रहिवासी आहेत परंतु सध्या ते महाराष्ट्रातील शहादा येथे राहतात, जिथे ते गिफ्ट शॉप चालवतात. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. नवसारी ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघ जैनचा व्हिसेरा तपासणीसाठी एफएसएलमध्ये पाठवण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे खरं कारण कळेल. याआधी गुजरातमध्ये अशा घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाGujaratगुजरात