किसान पोर्टल ठरणार शेतकर्यांसाठी मार्गदर्शक कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन : मान्यवरांच्या हस्ते घडीपत्रिकांचे विमोचन
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
जळगाव : शेतकर्यांनी उत्पादन केलेल्या शेतमालाची माहिती अपलोड करून ऑनलाईन बाजारपेठ मिळण्यासाठी किसान पोर्टल शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. किसान पोर्टलसह विविध घडीपत्रिकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते कृषी प्रदर्शनात करण्यात आले.
किसान पोर्टल ठरणार शेतकर्यांसाठी मार्गदर्शक कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन : मान्यवरांच्या हस्ते घडीपत्रिकांचे विमोचन
जळगाव : शेतकर्यांनी उत्पादन केलेल्या शेतमालाची माहिती अपलोड करून ऑनलाईन बाजारपेठ मिळण्यासाठी किसान पोर्टल शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. किसान पोर्टलसह विविध घडीपत्रिकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते कृषी प्रदर्शनात करण्यात आले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वालन करून कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी किसान पोर्टलबाबत माहिती दिली. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याने त्याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन केले.विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आमचे नियोजन असल्याचे सांगितले. यावर्षी ८० टक्के शेतकर्यांना कर्ज वाटप करण्याचे नियोजन आहे. जिल्हा बँकने आतापर्यंत २५० कोटी रुपयांची कर्जवाटप केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.संख्येबरोबर गुणवत्तेवर भर द्याआमदार हरिभाऊ जावळे यांनी येत्या पाच वर्षात शासनाने राबविलेल्या विविध योजनांमुळे दिलासादायक चित्र निर्माण होणार आहे. दुष्काळी स्थितीतदेखील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत आहेत. मात्र मालाचे उत्पादन करीत असताना क्वॉलिटीसोबत कॉण्टीटीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला. शेतकर्यांकडून केळी तीन रुपये किलोने विक्री होत असली तरी बाजारात ग्राहकाला ३० रुपये प्रमाणे मिळत आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील साखळी कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन अनिल भोकरे यांनी केले.मृदा आरोग्य पत्रिकेचे विमोचनयावेळी मान्यवरांच्या हस्ते पंतप्रधान पीक विमा योजना घडीपत्रिका, पंतप्रधान पीक विमा योजना पोस्टर्स, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पोस्टर, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद शेतकरी स्थानिक बियाणे कायदा पुस्तक, डॉ.रितेश पाटील यांच्या उष्माघातामध्ये होमिओपॅथी उपचार, मृदा आरोग्य पत्रिका अभियान पोस्टरचे विमोचन करण्यात आले.मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटपकार्यक्रमात चाळीसगाव येथील वसंत पाटील व सहकारी, प्रतिभा सूर्यवंशी, पाचोरा येथील चंद्रकांत पाटील व सहकारी यांना बियाणे वाटप करण्यात आले. तर विलास पाटील, मनोज सनेर, अशोक पाटील, पांडुरंग चौधरी यांच्यासह शेतकर्यांना आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी कापसाची उत्पादकता वाढविल्याबद्दल कृषी संशोधक एस.एस.फैलाडे यांचा सत्कार करण्यात आला.