शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी दरामुळे भाडे उद्योगाची वृद्धी घसरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:27 IST

वस्तू सेवा कराच्या (जीएसटी) उच्च दरामुळे भाडे उद्योगाचा (लिजिंग इंडस्ट्री) वृद्धीदर घसरणार असल्याची भीती या क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

कोलकाता : वस्तू सेवा कराच्या (जीएसटी) उच्च दरामुळे भाडे उद्योगाचा (लिजिंग इंडस्ट्री) वृद्धीदर घसरणार असल्याची भीती या क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या क्षेत्राचा वृद्धीदर १५ ते २0 टक्के आहे. भांडवली विकास परिषदेचे महासंचालक महेश ठक्कर यांनी सांगितले की, भाडे उद्योगावर यापूर्वी ५ ते १५ टक्के कर होता. जीएसटीमध्ये तो एकदम २८ टक्के करण्यात आला आहे. जास्त करामुळेखेळत्या भांडवलाची गरज वाढणार आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू भाड्यावर देण्याचा खर्च वाढेल. याचा फटका बसून अंतिमत: वृद्धी दरात घसरण होईल.ठक्कर यांनी सांगितले की, या क्षेत्राला सरकारने ऐशआरामाच्या वस्तू व सेवांच्या श्रेणीत टाकले आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे. जीएसटी दर कमी केल्यास सकळ देशांतर्गत भांडवल रचनेत भाडे उद्योगाचा वाटा वाढेल. सध्या भारतात हा वाटा केवळ २ टक्के आहे. जागतिक पातळीवर तो १0 टक्के आहे.एका बँकेतर वित्त कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, जास्तीच्या करामुळे भारतीय भाडे उद्योगात विदेशी कंपन्या येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होईल. जीएसटी दराप्रमाणेच इनपुट टॅक्स क्रेडिट, हप्ता थकल्यास दंडात्मक व्याज आणि शुल्क, फेरताबा मालमत्तांची विक्री यांसारख्या मुद्द्यांवरही काही दुरुस्त्यांची गरज आहे. >छोट्या व्यावसायिकांना फटकाअधिकाºयाने सांगितले की, या प्रकरणी आम्ही सरकारला निवेदन दिले आहे. तथापि, सरकारने आमच्या मागणीकडे अजून तरी लक्ष दिलेले नाही. भांडवलाची चणचण असलेल्या छोट्या व्यावसायिकांना याचा सर्वाधिक फटका बसेल. भारतात बांधकाम साहित्य, वॅगन्स, अवजड यंत्रे, कार यांसारख्या असंख्य वस्तू भाड्याने दिल्या-घेतल्या जातात. त्यांना नव्या कर व्यवस्थेत अडचणींचा सामना करावा लागेल.