शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात घरं स्वस्त होणार; 10 जानेवारीला मिळू शकते खूशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 18:03 IST

येत्या 10 जानेवारीला वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या (जीएसटी परिषद) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये निर्माणाधीन इमारती आणि बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न मिळालेल्या इमारतींमधील फ्लॅटवरील जीएसटी दर घटवून पाच टक्क्यांवर आणण्याचा विचार सरकारकडून केला जाण्याची शक्यता आहे.  

ठळक मुद्दे10 जानेवारीला होणार जीएसटी परिषदफ्लॅटवरील जीएसटी कर 5 टक्क्यांवर येणार ?अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली होणार जीएसटी परिषद

नवी दिल्ली - येत्या 10 जानेवारीला वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या (जीएसटी परिषद) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये निर्माणाधीन इमारती आणि बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न मिळालेल्या इमारतींमधील फ्लॅटवरील जीएसटी दर घटवून पाच टक्क्यांवर आणण्याचा विचार सरकारकडून केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या फ्लॅटवर 12 टक्के जीएसटी दर आकारला जात आहे. सोबतच लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या व्यवसायातील सवलतीची मर्यादा वाढवण्याबाबतही चर्चा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी 22 डिसेंबर 2018ला झालेल्या जीएसटी परिषदेमध्ये 28 टक्क्यांच्या कर श्रेणीतून 23 वस्तू वगळण्यात आल्या. यामुळे आता फक्त 28 वस्तूंवरच 28 टक्के जीएसटी आहे. आलिशान गाड्या, एसी, मोठे टीव्ही, डीश वॉशर यांसारख्या 28 वस्तूंवरील कर 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे. 

(घराचं स्वप्न होणार साकार? जीएसटीत मोठ्ठी सूट देण्याचा सरकारचा विचार)

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील जीएसटी परिषद 10 जानेवारी रोजी होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणारी जीएसटी परिषदेची ही 32वी बैठक आहे. या परिषदेमध्ये राज्यांचे अर्थमंत्रीही सहभागी होणार आहेत. 

(जीएसटीच्या अंमलबजावणीचे वर्ष, कुठे त्रास तर कुठे हर्ष!)

दरम्यान, बांधकाम पूर्ण झालेल्या, मात्र भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींमधील फ्लॅटवरील जीएसटी दर सध्या 12 टक्के आहे. हा दर 5 टक्क्यांवर आणण्याचा सरकारचा विचार आहे. जर असे झाल्यास सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मोठी मदत होईल.

'विक्रीवेळी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या फ्लॅटवर जीएसटी लागत नाही. अशा प्रकरणांमध्ये विकासकांनी इमारतीच्या बांधकामावेळी विविध वस्तूंवर कर दिला असल्यानं कराचा भार हलका होतो. त्यामुळे निर्माणाधीन इमारतींमध्ये जीएसटी दर 5-6 टक्के असायला हवा. मात्र उत्पादन साहित्य खरेदी करताना दिलेल्या कराचा फायदा विकासकांकडून ग्राहकांना दिला जात नाही' अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.

इमारतीसाठी आवश्यक असणारं 80 टक्के साहित्य नोंदणीकृत विक्रेत्यांकडून खरेदी करणाऱ्या विकासकांकडून 5 टक्केच जीएसटी आकारला जावा, असं मत अधिकाऱ्यानं व्यक्त केलं.

टॅग्स :GSTजीएसटीArun Jaitleyअरूण जेटलीCentral Governmentकेंद्र सरकार