शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी अडवले!

By admin | Updated: August 12, 2015 05:05 IST

विरोधक घालत असलेला गोंधळ संपूर्ण देशाला दिसू द्या, अशी भूमिका घेत तशा सूचनाच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभा टीव्हीच्या चमूला दिल्या.

नवी दिल्ली : विरोधक घालत असलेला गोंधळ संपूर्ण देशाला दिसू द्या, अशी भूमिका घेत तशा सूचनाच लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभा टीव्हीच्या चमूला दिल्या. हा गोंधळ देशाला दिसावा यासाठी कामकाज तहकूब न करता अध्यक्षांनी प्रश्नोत्तरांचा तास रेटला. त्याचवेळी काँग्रेसने मंगळवारी राज्यसभेचे कामकाज ठप्प पाडून वस्तू आणि सेवाकर विधेयक (जीएसटी) चर्चेसाठी मांडण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला. काँग्रेसच्या या कृतीने वित्तमंत्री अरुण जेटली कमालीचे संतापले. ‘त्यांना लोकसभा निवडणुकीतील पराभव अद्याप पचवता आलेला नाही,’ अशा शब्दांत जेटली यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.काँग्रेस पक्ष विकास आणि अर्थव्यवस्थेच्या मार्गात अडचणी निर्माण करीत आहे. सरकार राजकीय आणि संवैधानिक अशा सर्व प्रकारच्या उचित उपाययोजनांचा अवलंब करून जीएसटीला समर्थन देणाऱ्या पक्षांच्या मदतीने हे विधेयक पारित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, अशी घोषणा जेटली यांनी केली. २४५ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे ६८ सदस्य असणे ही सरकारची खरी अडचण आहे. देशाचा विकास रोखणे हा यांचा मुख्य उद्देश आहे. अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा, असे काँग्रेसला मुळीच वाटत नाही. काँग्रेसने अन्य मुद्द्यांच्या आडून कामकाज बंद पाडू नये. अर्थव्यवस्थेच्या विकासाला विरोध आहे, हे स्पष्टपणे सांगून टाकावे. - अरुण जेटली‘कामकाज सल्लागार समितीने चर्चा न केल्याने आणि समितीला त्यासाठी वेळ न दिल्याने या जीएसटी विधेयकावर चर्चा केली जाऊ शकत नाही,’ असे काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा म्हणाले.जेटली हे जीएसटी विधेयक मांडण्यासाठी उभे राहताच काँग्रेसच्या सदस्यांनी ‘हे घटनादुरुस्ती विधेयक असल्याकारणाने अशा गोंधळाच्या वातावरणात मी हे विधेयक चर्चेसाठी घेऊ शकत नाही,’ असे सांगत उपसभापती पी.जे. कुरियन यांनी राज्यसभेचे कामकाज संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब केले.राज्यसभेत भाजपाचे ४८ सदस्य आहेत आणि पक्षाला १२० सदस्यांचा पाठिंबा आहे. जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी दोनतृतीयांश मतांची गरज असल्याने भाजपाला आणखी पाठिंबा मिळविण्याची आवश्यकता आहे.