शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

28 किमी पायपीट करत नवरदेवाने गाठला मंडप; चालकांच्या संपाचा फटका, रात्रभर चालून पोहोचले वधूच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 09:22 IST

ओडिशाच्या रायगढ जिल्ह्यात ही घटना घडली. लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना ही घटना कायम स्मरणात राहील.

भुवनेश्वर : ओडिशातील व्यावसायिक वाहनांच्या चालकांच्या संपाचा एका नवरदेवास चांगलाच फटका बसला. संपामुळे वाहनांची व्यवस्था न झाल्यामुळे नवरदेवासह सर्व वऱ्हाडी मंडळींना रात्रभर २८ किलोमीटर चालत-चालत नवरीच्या घरी पोहोचावे लागले. ओडिशाच्या रायगढ जिल्ह्यात ही घटना घडली. लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना ही घटना कायम स्मरणात राहील.

कल्याणसिंहपूर तालुक्यातील सुनाखडी येथून हे  वऱ्हाड गुरुवारी रात्री पायी निघाले. रात्रभर चालून ते सकाळी दिबालापाडू येथे विवाहस्थळी पोहोचले. विवाह सोहळा व्यवस्थित पार पडला. मात्र, या वऱ्हाडाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. वऱ्हाडाचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. (वृत्तसंस्था)

कशासाठी आहे संप?-ओडिशातील वाहनचालकांची एक संघटना ‘एकता महासंघा’ने दिलेल्या माहितीनुसार, विमा, निवृत्तीवेतन आणि कल्याण बोर्ड स्थापन करण्याची वाहनचालकांची मागणी आहे. त्यासाठी ओडिशातील सर्व व्यावसायिक वाहनचालकांनी बुधवारी संपाची घोषणा केली होती. - वास्तविक, सरकारच्या आश्वासनामुळे चालकांनी आपला संप ९० दिवसांसाठी स्थगित केला आहे. ९० दिवसांत मागणी मान्य न झाल्यास पुन्हा संप पुकारला जाईल, असे संघटनेने म्हटले आहे.

२२ वर्षीय नरेश प्रस्का असे नवरदेवाचे नाव आहे. लग्नस्थळी पोहोचण्यासाठी ते १६ मार्च रोजी निघाले. वऱ्हाडासाठी त्याने ४ एसयूव्ही वाहनांची व्यवस्था केली होती. मात्र, चालकांच्या संपामुळे यापैकी एकही वाहन आले नाही. नरेशने सांगितले की, आम्ही आवश्यक सामान दुचाकी वाहनांद्वारे विवाहस्थळी पाठवून दिले. त्यानंतर ८ महिलांसह आम्ही सुमारे ३० वऱ्हाडी पायीच निघालो. हा अनुभव अविस्मरणीय राहिला, हे मात्र खरे. आमच्यासमोर अन्य कोणता पर्यायच नव्हता. कारण, एकही चालक चालण्यास तयार नव्हता. 

टॅग्स :Odishaओदिशा