शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

3 दिवसांपूर्वी नातवाचा मृत्यू झाला पण आजीला स्वप्नात जिवंत दिसला; कबर खणून पाहिली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 09:42 IST

3 दिवसांपूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. आजीने स्वप्नात अक्षत जिवंत असल्याचं पाहिल्यावर कबर पुन्हा खणण्यात आली.

उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील दुबग्गाच्या सैदपूर महरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी मृत पावलेल्या चिमुकल्याचा मृतदेह कबर खोदून बाहेर काढण्यात आला. आजीने स्वप्नात तिचा नातू अक्षय हा जिवंत असल्याचं पाहिलं. 3 दिवसांपूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. आजीने स्वप्नात अक्षत जिवंत असल्याचं पाहिल्यावर कबर पुन्हा खणण्यात आली आणि अक्षयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारीला सैदपूर महरी गावात राहणाऱ्या 3 वर्षीय अक्षयला अचानक उलट्या होऊ लागल्या. कुटुंबीयांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह गावाबाहेर दफन केला. विधीवत अंत्यसंस्कार करून कुटुंबीय, नातेवाईक घरी निघून गेले. पण तीन दिवसांनी भलतंच घडलं. 

आजीला तीन दिवसांनी पडलेल्या स्वप्नात अक्षय जिवंत असल्याचं दिसलं. आजीने कुटुंबीयांना अक्षय जिवंत असल्याचं सांगितलं. त्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा एकदा खरच अक्षय जिवंत असेल या आशेने कबर खणली. त्याआधी तिथे पूजा केली. अक्षयचा मृतदेह बाहेर काढला आणि लखनऊच्या बलरामपूर रुग्णालयात नेला. डॉक्टरांनी मृतदेह पाहिला आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. मात्र कुटुंबीय ऐकून घेत नव्हते.

अक्षयचे नातेवाईक ऐकत नसल्याचं पाहून रुग्णालय प्रशासनाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी कुटुंबाची परिस्थिती पाहिली आणि सहानुभूती म्हणून डॉक्टरांना पुन्हा एकदा अक्षयच्या मृतदेह पाहण्यास सांगितलं. डॉक्टरांनी अक्षयचे पल्सेस चेक केले. हार्ट बीट चेक करण्यासाठी ईसीजी मशीन लावली. मात्र मुलाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. कारण 3 दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"