शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कामासाठी मोबाइल वापरू नये", उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:51 IST

Madras High Court : येथील मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) खंडपीठाने एका सरकारी कर्मचाऱ्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा आदेश दिला.

चेन्नई : सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत वैयक्तिक कामासाठी मोबाइल फोन वापरू नये, असे तामिळनाडूमधील (Tamilnadu) एक न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, न्यायालयाने तमिळनाडू सरकारला  (Tamilnadu Govt) याबाबत नियमावली (Regulations) बनवण्यास सांगितले आहे. हे प्रकरण मदुराईचे आहे.

येथील मद्रास उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) खंडपीठाने एका सरकारी कर्मचाऱ्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा आदेश दिला. आरोग्य विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने ही याचिका दाखल केली होती. कार्यालयीन कामकाजादरम्यान कर्मचारी मोबाईल वापरताना आढळून आली होती. त्यामुळे विभागाने तिला निलंबित केले होते. त्याविरोधात तिने न्यायालयात याचिका दाखल करून आपले निलंबन रद्द करण्याचे आदेश विभागाला द्यावेत, अशी मागणी केली होती.

याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश एस. एम. सुब्रमण्यम (Justice SM Subramaniam)यांनी या प्रकरणाच्या तपशिलात जाण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आजकाल सरकारी कर्मचारी कार्यालयीन कामकाजादरम्यान वैयक्तिक कामासाठी मोबाईल फोन वापरतात हे सर्वसामान्य झाले आहे. ही चांगली प्रथा नाही. किमान सरकारी कर्मचाऱ्यांना तरी याची परवानगी देऊ नये. 

यासोबतच याचिका दाखल करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती न्यायाधीश एस. एम. सुब्रमण्यम यांनी राज्य सरकारला यासंदर्भात चार आठवड्यांत नियम आणि कायदे तयार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल न्यायालयासमोर सादर करा. त्यानंतरच या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

टॅग्स :MobileमोबाइलHigh Courtउच्च न्यायालय