शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांची हकालपट्टी

By admin | Updated: August 8, 2014 02:48 IST

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरुद्ध दंड थोपटणा:या कमला बेनीवाल यांची मिझोरमच्या राज्यपालपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यावरून राजकारण तापले आह़े

कमला बेनीवाल यांच्यावरून दिल्लीत राजकारण तापले
 
मोदी सरकार म्हणते, सूडबुद्धीने कारवाई नाही 
 
कारवाईमध्ये गैरवर्तन ठरला कळीचा मुद्दा 
 
हरीष गुप्ता ल्ल नवी दिल्ली
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरुद्ध दंड थोपटणा:या कमला बेनीवाल यांची मिझोरमच्या राज्यपालपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यावरून राजकारण तापले आह़े 
बेनीवाल यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप विरोधकांनी केला आह़े मोदी सरकारने मात्र हा आरोप धुडकावून लावत, यामागे कुठलेही राजकारण नसल्याचे म्हटले आह़े प्रत्यक्षात सूत्रंच्या दाव्यानुसार, ‘गैरवर्तन’ या मुद्दय़ाची खातरजमा केल्यानंतरच राष्ट्रपतींनी बेनीवाल यांना हटविण्यास मान्यता दिली.
मोदी सरकारने बेनीवाल यांची गुजरातमधून मिझोरमच्या राज्यपालपदी नेमणूक केली होती़ मात्र कार्यकाळ संपण्यास उणोपुरे दोन महिने उरले असताना काल (बुधवारी) रात्री त्यांना अचानक बडतर्फ करण्यात आल़े याचे गुरुवारी तीव्र पडसाद उमटल़े  
हे घटनात्मक पद आहे व सरकार बदलले तरी राज्यपाल हटवले जायला नको, असे सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे म्हटले होत़े त्यामुळे बेनीवाल यांना बडतर्फ करण्याचा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे, अशी टीका राजस्थान 
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट
यांनी केली. 
 
मोदी आणि बेनीवाल
काँग्रेस नेत्या डॉ़ कमला बेनीवाल या मूळच्या राजस्थानच्या.गुजरातच्या राज्यपालपदी असताना लोकायुक्त नेमणुकीवरून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व बेनीवाल यांच्या संबंधात कमालीची कटुता निर्माण झाली होती़  
 
काय आहेत आरोप?
च्कमला बेनीवाल यांनी सरकारकडून जमीन मिळविताना पदाचा प्रभाव वापरल्याचा आरोप आहे. त्याबाबतच्या कागदपत्रंची खातरजमा स्वत: राष्ट्रपतींनी करून घेतली. 
च्त्यासाठी त्यांनी अॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांचा कायदेशीर सल्लाही घेतल्याचा सूत्रंचा दावा आहे. मात्र गुजरातच्या राज्यपालपदी असताना हवाई प्रवासावर साडेआठ कोटी रुपये खर्च केल्याच्या आरोपाची दखल राष्ट्रपतींनी घेतलेली नाही.
 
बेनीवाल यांची बडतर्फी हे सूडबुद्धीचे राजकारण आह़े  - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख
 
राज्यपाल कमला बेनीवाल यांना बडतर्फच करायचे होते तर काही दिवस आधी मिझोरमचे राज्यपालपद त्यांना का दिले गेले?  
- अजय माकन, काँग्रेसचे सरचिटणीस 
 
बेनीवाल यांच्याविरुद्ध गंभीर आरोप आहेत़ त्याचमुळे केंद्र सरकारने कारवाई केली असून, ती पूर्णत: घटनात्मक आहे. 
- एम़ वेंकय्या नायडू, भाजपा
 
राज्यघटनेच्या चौकटीतच बेनीवालांविरुद्ध कारवाई करण्यात आली आह़े सरकारला काही सांगायचे असेल तर ते संसदेत सांगू. 
- रविशंकर प्रसाद, कायदामंत्री