शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'फिगर खराब होईल म्हणून शहरातील तरुणी तान्ह्या मुलांना स्तनपान करत नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 09:45 IST

मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं विधान

इंदूर: शहरातील तरुणी फिगर खराब होईल म्हणून तान्ह्या मुलांना स्तनपान करत नाहीत, असं मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी म्हटलं आहे. या विधानामुळे आनंदीबेन पटेल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. शहरात राहणाऱ्या आजच्या तरुणी लहान मुलांना बाटलीनं दूध पाजतात. त्यामुळे जशी बाटली फुटते, तसं मुलांचं नशीब फुटतं, असंही पटेल म्हणाल्या. त्या इंदूरमधील काशीपुरी अंगणवाडी केंद्रातील महिलांशी संवाद साधत होत्या. 'मुलांना बाटलीतून दूध पाजू नका. याचा फिगरशी कोणताही संबंध नाही,' असं आनंदीबेन पटेल अंगणवाडी सेविकांशी संवाद साधताना म्हणाल्या. 'प्रसुत झाल्यावर सरकारकडून दिले जाणारे पैसे सांभाळून खर्च करा. ते पैसे पतीकडे देऊ नका. त्या पैशांमध्ये फळं खरेदी करा. त्यामुळे तुमचं मूल सुदृढ होईल,' असं आनंदीबेन पटेल म्हणाल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून अंगणवाड्यांचा अहवालदेखील मागितला. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी रजनीश सिन्हा यांनी त्यांना कुपोषित मुलांबद्दलची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी आनंदीबेन पटेल यांनी हरदा जिल्ह्यातील टिमरनीमधील अंगणवाडी सेविकांशी संवाद साधताना वादग्रस्त विधान केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी अविवाहित असूनही त्यांना प्रसुतीवेळी आणि प्रसुतीनंतर महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव आहे, असं पटेल यांनी म्हटलं होतं. आनंदीबेन यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पंतप्रधान मोदी विवाहित असूनही आनंदीबेन यांनी त्यांना अविवाहित म्हटल्यानं उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. 'तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी 'त्यांनी' लग्न केलं नाही, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. नरेंद्र भाईंनी लग्न केलेलं नसलं, तरीही प्रसुतीवेळी आणि प्रसुतीनंतर महिलांना आणि मुलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, याची त्यांना कल्पना आहे,' असं आनंदीबेन यांनी म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश