शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगासाठी सरकारचे यंदा विक्रमी पेमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 04:13 IST

चालू वित्त वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत सरकारने कामगारांना विक्रमी पेमेंट केले आहे. उरलेल्या चार महिन्यांसाठी आता योजनेचा केवळ १० टक्के निधी उरला आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीनंतर ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’अंतर्गत (मनरेगा) काम मागण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे चालू वित्त वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत सरकारने कामगारांना विक्रमी पेमेंट केले आहे. उरलेल्या चार महिन्यांसाठी आता योजनेचा केवळ १० टक्के निधी उरला आहे.ग्रामविकास मंत्रालयाने मनरेगासाठी यंदाच्या वित्त वर्षाकरिता ८४,९०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील ७६,८०० कोटी रुपये एप्रिल-नोव्हेंबर या आठ महिन्यांत खर्च झाले आहेत. गेल्यावर्षी या काळात ५० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. यंदा अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा १२ टक्के अधिक खर्च झाला आहे. या वित्त वर्षाचे आणखी चार महिने शिल्लक आहेत. तथापि, करण्यात आलेल्या तरतुदीपैकी फक्त १० टक्केच रक्कम आता उरली आहे.आणखी निधी उपलब्ध करुन देणारवित्त मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, मनरेगासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गरज भासल्यास आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल. मनरेगाअंतर्गत एका कुटुंबास १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. यंदा नोव्हेंबरपर्यंत १० दशलक्ष कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या २४३ टक्के अधिक आहे.