शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

तुमच्या सोशल मीडियावर सरकारची नजर?, व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेपाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:28 IST

तुम्ही जर फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडियावर असाल, तर सावध राहा

शीलेश शर्मानवी दिल्ली : तुम्ही जर फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या सोशल मीडियावर असाल, तर सावध राहा. केंद्रातील मोदी सरकार यापुढे सर्व सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने एका खासगी कंपनीला कंत्राट देऊ न असे सॉफ्टवेअर तयार केले आहे की, ज्याद्वारे तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल.तुम्ही यूट्यूबवर काय पाहत आहात, व्हॉट्अ‍ॅपवर तुम्हाला काय संदेश वा छायाचित्रे, व्हिडीओज येत आहेत वा तुम्ही पाठवत आहात, फेसबुकवर तुम्ही काय पोस्ट केली आहे, तुमच्या ईमेलद्वारे तुम्ही कोणाला व काय मेल केला आहे, त्यात काय लिहिले आहे, ही सर्व माहिती या सॉफ्टवेअरमुळे केंद्र सरकारला कळेल. या सर्वाचे सरकार रेकॉर्ड ठेवेल आणि जेव्हा वाटेल, तेव्हा रेकॉर्डमधील माहितीचा उपयोग केला जाईल.त्याचा हॅब तयार करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने ४२ कोटी रुपयांची निविदाही दिली आहे. त्यामुळे आता कोणताही क्षणी हे काम सुरू होईल. त्याद्वारे तुमची माहिती, पत्ता, फोन व मोबाइल क्रमांक हा सारा डेटाही सरकारला मिळेल.काँग्रेस न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारकाँग्रेसने या विरोधात मैदानात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत आयुष्यावर हल्ला आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप होऊ नये, यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते व प्रख्यात कायदेतज्ज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या९ न्यायाधीशांनी प्रत्येकाच्या खासगी आयुष्याला जे संरक्षण दिले आहे, त्या विरोधात सरकार कृती करू पाहात असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ व १९ चा हवाला देत ते म्हणाले की, सरकार जे करू पाहात आहे, ते उघडपणे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ३ ही व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ करण्याची कोणाला परवानगी देत नाही.मोदी सरकार आश्वासन विसरलेसरकारचे हे प्रयत्न गंभीर आहेत, असे सांगून अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, नमो अ‍ॅपद्वारे १३ लाख एनसीसी कॅडेट्सचा डेटा सरकारने यापूर्वीच घेतला आहे, पण ४ मे २0१७ रोजी भारताच्या अ‍ॅटर्नी जनरलने सर्वोच्च न्यायालयात जे आश्वासन दिले होते, ते मोदी सरकार विसरले असावे, असे वाटते. फेब्रुवारी २0१८ मध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून सर्व खातेदारांचा डेबिट व क्रेडिट कार्डांचा डेटा लिक झाला होता, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. न्यायालयाचे दार निश्चितच ठोठावू. कारण जनतेच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा कोणालाही अधिकार नाही. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी लोकांच्या घरांत डोकावण्याचा हा सरकारचा प्रयत्न आम्ही मोडून काढू, असेही सिंघवी यांनी सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया