शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'एक देश एक निवडणूक'नंतर आता 'एक देश एक रेशनकार्ड'; नव्या योजनेवर काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 09:53 IST

मोदी सरकारकडून नव्या योजनेवर काम सुरू

नवी दिल्ली: सध्या एक देश, एक निवडणूक यावर जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. विरोधकांनी एक देश, एक निवडणूक या चर्चेत सहभागी व्हावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. यानंतर आता मोदी सरकारनं एक देश, एक रेशनकार्ड योजनेवर काम सुरू केलं आहे. सरकार या दिशेनं काम करत असल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा रामविलास पासवान यांनी दिली. देशभरात रेशनकार्ड्सची पोर्टेबिलिटी सुरू करण्यात येणार असल्याचं पासवान यांनी सांगितलं. यामुळे रेशनकार्डधारकांना देशभरातील कोणत्याही रेशनिंग दुकानातून अन्नधान्याची खरेदी करता येईल. याचा मोठा फायदा देशभरात सतत प्रवास करत असलेल्या लोकांना होईल. पासवान यांनी काल (गुरुवारी) सर्व राज्यांच्या खाद्य सचिवांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी एक देश एक रेशनकार्ड या योजनेवर भाष्य केलं. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अंतर्गत रेशनकार्ड्सचं केंद्रीय संग्रह केंद्र तयार केलं जाईल, असं पासवान म्हणाले. रेशनकार्ड्सच्या डिजिटलायझेशनवर काम करा, अशी सूचना खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बैठकीला उपस्थित सर्व राज्यांच्या अधिकाऱ्यांना दिली. एक देश एक रेशनकार्ड योजना लागू झाल्यास रेशनकार्डचा वापर देशभरात कुठेही करता येऊ शकेल. आधार कार्डप्रमाणेच रेशनकार्डलादेखील एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल. त्यामुळे बोगस रेशनकार्ड्सना आळा बसेल.