शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनेचा लाभ घेण्याचा सरकारचा मनसुबा, ‘मनरेगा’सारखा फायदा घेणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 03:44 IST

केंद्रातील भाजप सरकारने आपल्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना ५० कोटी दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना (आयुष्यमान भारत- राष्ट्रीय आरोग्य विमा योजना) सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेतहत १० कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियांना ५ लाख रुपयांपर्यंत विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने आपल्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना ५० कोटी दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना (आयुष्यमान भारत- राष्ट्रीय आरोग्य विमा योजना) सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेतहत १० कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबियांना ५ लाख रुपयांपर्यंत विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. यासाठी जातनिहाय-आर्थिक सर्वेक्षणातील माहितीचा उपयोग केला जाणार आहे. ही एक योजना आहे, असे वाटत असले तरी भाजप या योजनेकडे आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने एक हुकमी पत्ता म्हणून पाहत आहे. या योजनेच्या माध्यमातून भाजप एका दमात एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश घरात पोहोचू पाहत आहे. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत सरकारला मनरेगा या राष्टÑीय योजनेचा फायदा झाला होता, तसाच २०१९ च्या निवडणुकीत फायदा होईल, असे भाजपला वाटते.पहिल्या टप्प्यात पथदर्शी प्रकल्पातहत सर्व राज्यांत ही योजना सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. जेणेकरून देशभरात सर्वत्र भाजप अनुकूल वातावरण निर्माण होईल आणि त्याचा भाजपला फायदा होईल. विशेषत: गरिबी आणि बेरोजगारी असलेल्या बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, प. बंगाल, राजस्थान, ओडिशासोबत महाराष्टÑातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील गरीब कुुटुंबियांत जम बसून फायदा लाटण्याचा भाजपचा बेत आहे. सोबतच या योजनेच्या आधारे मोदी सरकार आपल्या राजवटीतील एक प्रमुख योजना म्हणून प्रस्थापित करू पाहत आहे. पथदर्शी प्रकल्पानंतर ही योजना सर्वत्र राबविण्याचा सरकारचा इरादा आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यास केला जाणार आहे. विदेशाप्रमाणे प्रत्येकाला आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळावा, यावर विचार केला जाणार आहे.दिल्लीतील आम आदमी पार्टीने गल्ली-बोळांत अशी केंद्रे सुरू केली होती. त्याचा आम आदमी पार्टीला कसा आणि किती लाभ झाला, याचे मूल्यांकन उपरोक्त योजना घोषित करताना करण्यात आले होते.सरकारने क्षय रुग्णांना मोफत आरोग्यसेवा देण्यासाठी ६०० कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्यासोबत २४ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे ठरविले आहे.भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याने सांगितले की, लोकांना आरोग्यसेवा देण्याची आमची इच्छा आहे. मग याकडे राजकीय दृष्टिकोनातून का पाहिले जाते. भाजपनेच एम्स सुरू केले होते, हे विसरता कामा नये. याचा काही अंशी राजकीय फायदा होऊ शकतो, अशी कबुलीही या नेत्याने दिली.१.५ लाख आरोग्य केंद्र सुरू करणारगरीब कुटुंबाच्या उत्पन्नातील ५५ टक्के कमाई उपचारावर खर्च होते. प्रसंगी वैद्यकीय उपचारासाठी घर आणि जमीन विकण्याची पाळी येते. या योजनेचा गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबियांना फायदा झाल्यास सरकारलाही फायदा होणार हे निश्चित.राजकीय प्रभावाचा विचार करून सरकार आयुष्यमान भारत योजनेसोबत १.५ लाख आरोग्य केंद्र सुरू करणार आहे. यामुळे लोकांना राहत्या ठिकाणी आरोग्यसेवा देता येईल.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्प