शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

२0 लाख लोकांना सरकार देणार रोजगार; केंद्र व राज्यांतील पदे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 06:14 IST

केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार आहे. त्यातील २ लाखांहून अधिक पदे रेल्वेतील असून, ती भरण्याची घोषणा आधीच झाली आहे.

नवी दिल्ली : देशात वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावरून विरोधकांनी टीका सुरू केल्यामुळे मोदी सरकारने जोरात हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार आहे. त्यातील २ लाखांहून अधिक पदे रेल्वेतील असून, ती भरण्याची घोषणा आधीच झाली आहे. या मेगाभरतीची सुरुवात केंद्राची विविध खाती व सार्वजनिक क्षेत्रातील २४४ कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे.केंद्रीय कामगार मंत्रालयाने या मेगाभरतीसाठी पुढाकार घेतला आहे. कामगार मंत्रालय सध्या विविध खात्यांमध्ये असलेल्या रिकाम्या पदांची माहिती घेत आहे. ती मिळाल्यानंतर नव्या योजनेचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक तत्त्वावर ही पदे भरण्यात येतील, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाºयाने दिली.प्रशासनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी केंद्र तसेच अनेक राज्यांनी नोकरभरती थांबवली होती. त्यामुळे अनेक पदे बºयाच वर्षांपासून रिक्त आहेत. पण येत्या काही महिन्यांत हे चित्र बदलेल, असे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्येच सध्या ६ लाखांहून अधिक जागा रिकाम्या आहेत.केंद्रीय पातळीवर ही योजना यशस्वी झाल्यास राज्यांच्या पातळीवरदेखील ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असे अधिकाºयाने सांगितले.या मेगाभरतीद्वारे सुमारे २० लाख युवकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कामगार मंत्रालयाकडून लवकरच सर्व खात्यांकडून तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे.निवडणुका जवळ आल्यामुळे..?नरेंद्र मोदी यांनी २0१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात, आम्ही सत्तेवर आल्यास दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ , असे आश्वासन दिले होते.पण प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांत तेवढे रोजगार निर्माण होणे सोडूनच द्या, पण अनेक जणांचा असलेला रोजगारच हिरावून घेतला गेला.खासगी उद्योगांमध्ये तर रोजगारनिर्मिती तर थांबल्यातच जमा आहे. त्यामुळे रोजगाराच्या प्रश्नावरून केंद्र सरकार व विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. म्हणून लोकसभा निवडणुका दोन वर्षांवर आल्या असताना हे पाऊ ल उचलण्यात येत आहे.6,00000 अधिक जागा केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्येच रिकाम्या...

टॅग्स :Governmentसरकार