शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकार झुकले

By admin | Updated: August 31, 2015 02:23 IST

वादग्रस्त भूसंपादन वटहुकुमाची मुदत सोमवारी ३१ आॅगस्ट रोजी संपत असताना यापुढे पुन्हा वटहुकूम आणला जाणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नवी दिल्ली : वादग्रस्त भूसंपादन वटहुकुमाची मुदत सोमवारी ३१ आॅगस्ट रोजी संपत असताना यापुढे पुन्हा वटहुकूम आणला जाणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात केली आहे. संसदेत आणि बाहेर जोरदार विरोध झाल्यानंतरही तीनदा वटहुकूम जारी करीत या कायद्याचा हेका कायम ठेवणाऱ्या सरकारला अखेर नमते घ्यावे लागल्याचे त्यातून स्पष्ट झाले. प्रलंबित भूसंपादन विधेयकाबाबत शेतकऱ्यांच्या हिताच्या सूचना व शिफारशी स्वीकारण्याची तयारी असल्याचेही मोदींनी सूचित केले. गावकरी व गावांच्या भल्यासाठी २०१३च्या कायद्यात अनेक राज्यांनी सुधारणा सुचविल्या होत्या. त्यानुसार बदल करण्यात आले; मात्र विरोधकांनी या विधेयकाबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण केल्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या विधेयकाबद्दल वाद निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कोणताही निर्णय घेण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले.निम्न पदांसाठी मुलाखतींना फाटाकाही सरकारी नोकऱ्यांसाठी मुलाखतींची अनिवार्यता संपुष्टात आणण्याबाबत सरकार काम करीत आहे. निम्न पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती हे भ्रष्टाचाराचे कारण ठरत असल्याचे दिसते. निम्न पदांसाठी मुलाखतींची आवश्यकता आहे काय? मुलाखतीला बोलावले जाते तेव्हा गरीब पालक शिफारस आणि वशिल्यासाठी ठिकठिकाणी चकरा मारतात. भरती करताना मुलाखती हेच भ्रष्टाचाराचे कारण ठरते. - नरेंद्र मोदीशेतकऱ्यांचा आवाज महत्त्वाचा भूसंपादन वटहुकूम संपुष्टात येऊ देण्याचा निर्णय मी घेतला आहे. याचा अर्थ माझ्या सरकारने सूत्रे स्वीकारण्यापूर्वीची स्थिती कायम राहील. माझ्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज सर्वाधिक महत्त्वाचा आहे.हे विधेयक संसदेत पारित न झाल्यामुळे तीनवेळा वटहुकूम जारी करावा लागला, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी २० मिनिटांच्या भाषणात या विधेयकामागची भूमिका स्पष्ट करण्यावर अधिक वेळ दिला. राज्यांनी भूसंपादन विधेयकात अनेक सुधारणा सुचविल्या, त्या स्वीकारल्या. जलसिंचनासाठी बंधारे, विजेचे खांब, रस्ते, गरीब गावकऱ्यांसाठी घरे उभारण्याची तसेच हा कायदा नोकरशहाच्या कचाट्यातून मुक्त ठेवण्याचा उद्देश होता. सरकारने विधेयक आणल्यानंतर विरोधकांनी खूप गैरसमज निर्माण करीत शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण केली. आता शंकेचे कारण असणार नाही. तुम्ही घाबरण्याचे काही कारण नाही, असे ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले. भूसंपादन वटहुकूम पुन्हा जारी न करण्याचा निर्णय घेऊन मोदी सरकारला जनतेसमोर अखेर झुकावे लागले. हे सरकार शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या जमिनी श्रीमंत मित्रांमध्ये वाटून देण्याचा त्यांचा डाव आहे. आम्ही संसदेत शेतकऱ्यांच्या हितासाठी लढलो. त्यामुळेच सरकारला झुकावे लागले. - सोनिया गांधीजनतेच्या विरोधापुढे मोदी सरकारला नमते घ्यावे लागले. भूसंपादन वटहुकूम मागे घेतला जाणे हा आनंदाचा दिवस आहे. हा सर्व देशातील जनतेचा मोठा विजय आहे. - नितिश कुमार, बिहार मुख्यमंत्री