नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सी-सॅट परीक्षेवरून विद्याथ्र्याचे तीव्र झालेले आंदोलन आणि संसदेतील विरोधकांचा आक्रमक पवित्र बघता, या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आह़े
आज बुधवारी संसदीय कामकाज राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली़ यूपीएससीची परीक्षा देणा:या इच्छुक विद्याथ्र्याचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्या हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आह़े त्यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह आहेत़ त्याअनुषंगाने राज्यघटनेच्या आठव्या परिच्छेदात सामील सर्व भाषांत यूपीएससी परीक्षा आयोजित करण्याची एक सूचना सदस्यांनी केली आह़े या संपूर्ण पाश्र्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलवली जाईल आणि चांगल्या सूचनांवर अंमल केला जाईल, असे जावडेकर यावेळी म्हणाल़े
येत्या 24 ऑगस्टला होऊ घातलेली यूपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, असे संकेतही जावडेकर यांनी यावेळी दिल़े येत्या 24 ऑगस्टला पूर्वपरीक्षा होत आह़े सुमारे नऊ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत़ या सर्वाना शुभेच्छा द्यायला हव्यात, असेही ते म्हणाल़े
यूपीएससी सीसॅट आणि या परीक्षेत इंग्रजीला महत्त्व देण्याच्या मुद्यांवरून उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आह़े नागरी सेवा परीक्षेची तयारी करीत असलेल्या हिंदी भाषक पट्टय़ातील विद्यार्थी सीसॅटला विरोध करीत आहेत. सीसॅटमुळे सर्व विद्याथ्र्याना समान संधी मिळत नाही. ही परीक्षा कला, समाज विज्ञान आणि ग्रामीण पाश्र्वभूमी असलेल्या विद्याथ्र्याविरुद्ध असल्याचा त्यांचा दावा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4 यूपीएससी सीसॅट परीक्षा रद्द करा, अशी मागणी करणा:या उमेदवारांचे आंदोलन आज बुधवारीही सुरू होत़े राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव आणि त्यांचे समर्थकही या आंदोलनात सहभागी झाले होत़े
4 यादव यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दीडच्या सुमारास आंदोलक अशोका मार्गावरील भाजपा मुख्यालयाबाहेर जमल़े भाजपा आणि सी-सॅट परीक्षेविरुद्ध त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली़ हा केवळ इंग्रजी वा हिंदीचा प्रश्न नाही तर प्रतिकूल परिस्थितीतून, गावखेडय़ातील गरीब कुटुंबातून आलेल्या युवांच्या अधिकारांचा प्रश्न आहे, असे पप्पू यादव यावेळी म्हणाल़े