शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरभरती आॅनलाईन पद्धतीने

By admin | Updated: May 1, 2016 01:50 IST

सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया योजनेवर आधारित

नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया योजनेवर आधारित या योजनेच्या अंमलबजावणीनंतर अर्जदारांना सरकारी कार्यालयांच्या खेट्या घालणे आणि तातडीने व्हेरीफिकेशनसाठी लाच देण्याची गरज पडणार नाही.उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्यापासून तर नियुक्तीपर्यंत कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांला सामोरे जावे लागणार नाही, हे विशेष! सचिवांच्या एका गटाने जानेवारी महिन्यात भरती प्रक्रिया आॅनलाईन करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार सरकारने हे पाऊल उचलले आहे. १२ सचिवांच्या या गटात कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे सचिव संजय कोठारी आणि विदेश सचिव एस. जयशंकर यांचा समावेश होता. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, कार्मिक मंत्रालयाचे सचिव या योजनेच्या तातडीने अंमलबजावणीसाठी सचिव गटाच्या शिफारशींचा दर आठवड्याला आढावा घेत आहेत. केंद्रातील सर्व सचिव आणि राज्यांच्या मुख्य सचिवांसमक्ष ही योजना मांडण्यात आली आहे.याशिवाय अर्जदारांना प्रमाणपत्रांच्या मूळ अथवा छायांकित प्रती देण्याचीही गरज पडणार नाही. ते आपले प्रमाणपत्र डिजिटल लॉकरमध्ये अपडेट करू शकतील. तेथून सरकारला गरज पडल्यास हे दस्तावेज आॅनलाईन मिळू शकतील. डिजिटल लॉकरमध्ये अपलोड केलेले प्रमाणपत्रच पुरेसे असतील आणि संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन असेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)