शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

डीपफेकविरोधात सरकार ‘ॲक्शन’ मोडवर! सरकारने बोलावली बैठक, गुगल-मेटाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 23:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक फोटो आणि व्हिडिओंचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेक फोटो आणि व्हिडिओंचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे. मंत्री अश्विनी वैष्णव आणि राजीव चंद्रशेखर आणि मंत्रालयाचे उच्च अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत फेसबुक-इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटा आणि गुगलसह विविध पक्षांना बोलावण्यात आले आहे. गेल्या शुक्रवारी भाजपच्या मुख्यालयात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी बनावट डीपी व्हिडिओंच्या प्रसाराबाबत सतर्क राहण्यास सांगितले होते. त्यांनी नुकत्याच घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला, तिथे एका व्हिडिओमध्ये पंतप्रधानांना डीपफेक व्हिडिओद्वारे बनावट पद्धतीने गरबा करताना दाखवण्यात आले होते.

सॅम ऑल्टमननंतर आता इलॉन मस्क यांची वेळ! टेस्लामधून काढून टाकण्याची मागणी का होतेय?

काही दिवसापूर्वी, साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिचा एक बनावट व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यानंतर बॉलिवूडपासून राजकीय वर्तुळात याविषयी बराच वाद झाला होता. चुकीची माहिती आणि डीपफेकमुळे निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गेल्या सहा महिन्यांत दुसरी सल्लागार जारी केली, ज्यात ऑनलाइन प्लॅटफॉर्मना डीपफेकच्या प्रसाराविरुद्ध निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन केले.

आयटी कायदा २०२१ अंतर्गत, ऑनलाइन प्लॅटफॉर्म कोणत्याही वापरकर्त्याद्वारे चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कायदेशीररित्या बांधील आहेत. वापरकर्त्याकडून किंवा सरकारी अधिकार्‍यांकडून अहवाल मिळाल्यानंतर त्यांना ३६ तासांच्या आत असा कंटेट काढून टाकणे आवश्यक आहे. या आवश्यकतेचे पालन न करणे नियम ७ अंतर्गत येते, जे प्रभावित व्यक्तींना भारतीय दंड संहिताच्या तरतुदींनुसार न्यायालयात जाण्याचा अधिकार देते.

डीपफेक व्हिडिओमध्ये डिजिटल माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचा चेहरा बदलला जाऊ शकतो. त्याच्या जागी दुसरा चेहरा जोडला आहे. हा व्हिडीओ कोणालाही सहज फसवू शकतात. यामध्ये मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMetaमेटा