शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरकार लोकशाहीचा गळा घोटतेय : सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 05:33 IST

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत संसदेबाहेर आपले मत व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी संसदेतील १४३ विरोधी सदस्यांच्या निलंबनावरून बुधवारी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत संसदेबाहेर आपले मत व्यक्त केले. यापूर्वी कधीही इतक्या विरोधी खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले नव्हते आणि तेही केवळ न्याय्य मागणीसाठी. 

त्या म्हणाल्या की, १३ डिसेंबरला जे घडले ते अक्षम्य आहे. सभागृहात फलक झळकावल्याबद्दल आणि घोषणाबाजी केल्याबद्दल गेल्या काही दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेतून एकूण १४३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. संसदेच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी इंडिया आघाडीचे खासदार करत आहेत. 

बेरोजगारीवर चर्चा का होत नाही : राहुल गांधीतृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभापती धनखड यांची नक्कल केल्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षांच्या सुमारे १५० खासदारांना संसदेबाहेर काढण्यात आले; पण त्यावर कोणतीही चर्चा माध्यमांमध्ये होत नाही. बेरोजगारीवर चर्चा होत नाही. राफेलसह अनेक मुद्द्यांवर चर्चा होत नाही. 

मी आरोप केला तर ते योग्य होईल का?...प्रत्येक गोष्टीत कोणीही जातीचा ओढूनताणून संबंध आणू नये. मागासवर्गीय असल्याने मला राज्यसभेत अनेकदा बोलू दिले जात नाही, असा मी आरोप केला तर ते योग्य होईल का?. माझी नक्कल करून जाट असल्याचा अवमान केला आहे, असा आरोप उपराष्ट्रपती धनखड यांनी केला होता. अशी विधाने करणे योग्य आहे का. -मल्लिकार्जुन खरगे, पक्षाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी