नवी दिल्ली : ३२ लाखांपेक्षा जास्त डेबिट कार्डांचा डाटा चोरी झाल्या प्रकरणी सरकारने अहवाल मागितला असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. जेटली यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया आणि अन्य बँकांना डाटा चोरीची माहिती देण्यास सांगण्यात आले. तसेच अशा सायबर गुन्ह्याचा मुकाबला करण्यास बँकांची काय तयारी आहे, याविषयीची माहिती देण्यासही सांगण्यात आले. यातून होणारे नुकसान रोखण्यास हे पाऊल सरकारने उचलले आहे. भारतातील ३२ लाखांपेक्षाही जास्त डेबिट कार्डांवरील माहिती चोरीला गेल्याचे समोर आले आहे. चीनमधील अज्ञात ठिकाणाहून या कार्डांवर व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)१९ बँकांना महाचोरीचा फटकाभारतात सुमारे ६0 कोटी डेबिट कार्डे वापरात आहेत. त्यापैकी १९ कोटी कार्डे स्वदेशी बनावटीची रुपे कार्डे आहेत. बाकीची व्हिसा आणि मास्टर-कार्ड या कंपन्यांची आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, १९ बँकांना या महाचोरीचा फटका बसला आहे. काही बँकांनी रीतसर तक्रारी नोंदविल्या आहेत. डाटा चोरीप्रकरणी ६४१ तक्रारी दाखलनॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डेबिट कार्ड डाटा चोरी प्रकरणी देशभरात १९ बँकांत ६४१ तक्रारी अधिकृतरीत्या दाखल करण्यात आल्या आहेत. आपल्याच बँकेचे एटीएम केंद्र वापरण्याचा अनेक बँकांचा सल्लाअर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले की, या घटनेने घाबरून जाण्याचे कारण नाही. यावर तातडीने योग्य कारवाई होईल. बँक आॅफ बडोदा, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक, आंध्र बँक आदी बँकांनी खबरदारीचा उपाय म्हणून ग्राहकांना नवी कार्डे दिली आहेत. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि येस बँक या खाजगी बँकांनी ग्राहकांना पासवर्ड बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. एचडीएफसीने आपल्याच बँकेचे एटीएम केंद्र वापरण्याचा सल्लाही दिला आहे. हिताची पेमेंट सर्व्हिसेसच्या यंत्रणेवरून येस बँकेच्या नेटवर्कचा वापर गुन्हेगारांनी केल्याची माहिती आहे.6 लाख कार्डे स्टेट बँक आॅफ इंडियाने परत मागविली असून, या ग्राहकांना नवे कार्ड देण्यात येणार आहे. काही बँकांनी चोरी प्रकरणात सापडलेली संशयित कार्डे तत्काळ ब्लॉक केली आहेत. काहींनी पासवर्ड बदलण्याच्या सूचना ग्राहकांना केल्या आहेत.
डेबिट कार्ड डाटा चोरीप्रकरणी सरकारने मागविला अहवाल!
By admin | Updated: October 22, 2016 02:01 IST