शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला इंदिरा गांधींचाच विसर; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 06:12 IST

आज केंद्र सरकार इंदिरा गांधींचे नावही घ्यायला तयार नाही, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांची टीका.

नवी दिल्ली : भारताने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला पराभूत करून, त्याचे दोन तुकडे पाडले आणि बांगलादेश निर्माण केला, त्यास ५० वर्षे होत असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे सौजन्यही केंद्र सरकार दाखवत नाही. सरकारची ही संकुचित वृत्ती अतिशय दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

त्या विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त देशात  कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्ती वाहिनीला मदत आणि बांगलादेशची निर्मिती हे सर्व निर्णय इंदिरा गांधी यांनीच घेतले होते. त्या युद्धानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक विरोधकांनी इंदिरा गांधी यांना देवी दुर्गा म्हटले होते. मात्र आज केंद्र सरकार  इंदिरा गांधींचे नावही घ्यायला तयार नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

यांना बलिदान माहीत नाहीराहुल गांधी यांनी उत्तराखंडात १९७१ च्या युद्धात सहभागी अधिकाऱ्यांचा सत्कार केला. प्रत्येक गोष्टीचे इव्हेंट करू पाहणारे मोदी यांना सैनिकांच्या बलिदानाचे महत्व कळणार नाही. इंदिरा गांधी यांचे नाव घेण्याचे सौजन्य त्यांच्यात नाही. ज्या महिलेने देशाच्या ऐक्यासाठी अंगावर ३२ गोळ्या झेलल्या, तिच्याविषयी भाजपला साधा आदरही नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी