शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ह्रॅलो-३ हरमलातील गतिरोधकाबाबत शासन उदासीन ग्रामस्थांत नाराजी

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

हरमल : येथील पंचायत क्षेत्रातील अधिकतर अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक निर्माण करावेत, अशा आशयाचे ग्रामसभा ठराव मंजूर करून पाठविल्यास वर्षे उलटली. तरीही शासन दखल घेत नसल्याने खात्याच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हरमल : येथील पंचायत क्षेत्रातील अधिकतर अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक निर्माण करावेत, अशा आशयाचे ग्रामसभा ठराव मंजूर करून पाठविल्यास वर्षे उलटली. तरीही शासन दखल घेत नसल्याने खात्याच्या उदासीनतेबद्दल ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अलीकडे हरमल पंचायत क्षेत्रातील तिठानजीकचे मासळी मार्केट बामणभाटी आगरनजीक स्थलांतर केले. तिठा भागातील वाहतूक कोंडी सुटली आणि दररोजची कटकट दूर झाली, असे वाटत होते. तरीही सध्या मार्केटनजीक वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करून ठेवीत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अपघाताची श्क्यता अधिक असल्याने माजी पंच दिलीप वस्त यांनी गतिरोधक उभारण्याच्या ठराव मंजूर करून घेतला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालय त्याबाबत उदासीन असल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करतात.
मुख्य रस्ता ते खालचावाडा समुद्रकिनारा रस्ता हा नेहमीच गजबजलेला असतो. या रस्ता मार्गात प्रवीण वायंगणकर यांच्या निवासस्थानासमोरील धोकादायक वळणावर दर पर्यटन हंगामात कित्येक अपघात घडत असतात. त्या प्रकारच्या अपघाताची दखल घेत प्रवीण वायंगणकर यांनी १० वर्षांपूर्वी त्या धोकादायक वळणावर गतिरोधक उभारण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर केला होता. संबंधित खात्यास तो मंजुरीसाठी पाठविला; परंतु खात्याने अद्याप त्याची दखल घेतली नाही.
दरम्यान, अलीकडे साधारण नारायणदेव जंक्शन, बामणभाटी शंकर नाईक, शंभू वायंगणकर यांच्या निवासस्थानानजीक, मधलावाडा मेथर यांच्या निवासस्थानाजवळ, केपकरवाडा वळणावर आदी ठिकाणी गतिरोधकाची मागणी आहे. मात्र, मांद्रे पंचायत क्षेत्रात काही गतिरोधक अनावश्यक वाटतात. हे गतिरोधक निर्माण करताना हरमल पंचायत क्षेत्राचा विचार केला नसल्याने संबंधित खाते निष्क्रिय असल्याची टीका नागरिक करतात. तरी जिल्हाधिकारी व वाहतूक खात्याने हरमल ग्रामस्थांच्या मागणीची दखल घ्यावी, अशी मागणी सर्व लोकांनी केली आहे. (प्रतिनिधी)