शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून आरबीआय ताब्यात घेण्याचा प्रयत्न - चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 04:10 IST

मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे.

कोलकाता : मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला राज्यनिहाय आघाडी फायद्याची ठरेल, असेही त्यांनी सूचित केले.मोदी यांच्या सरकारने आपले निवडक लोक रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर नेमले असून आपले प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या गळी उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत असे प्रस्ताव पुढे केले जातील. आर्थिक तुटीमुळे सरकार अडचणीत आले असून निवडणूक वर्षात होणाºया खर्चासाठी सरकारला पावले उचलायची आहे. सर्व मार्ग बंद झाल्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँकेकडे एक लाख कोटींची मागणी केली असल्याचे त्यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. आरबीआयचे गव्हर्नर यांनी आपली भूमिका ठाम राखल्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँक कायदा १९३४ च्या कलम ७ नुसार रिझर्व्ह बँकेकडून एक लाख कोटी रुपये आपल्या खात्यात वळते करण्याचा आदेश देण्याचे ठरविले आहे, असा दावाही चिदंबरम यांनी केला.विविध राज्यांमध्ये आघाड्या व्हाव्या...राज्यनिहाय आघाड्या काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार असून भाजपच्या पराभवाचा तोच सर्वोत्तम मार्ग आहे, असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. अलीकडेच कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस- जद आघाडी विजयी झाल्याचा संदर्भ त्यांनी दिला. कर्नाटकमध्ये स्थापन झालेल्या आघाडीचे चांगले फलित मिळाले आहे. विविध राज्यांमध्ये अशा आघाड्या स्थापन केल्या जाव्या, असे त्यांनी येथे काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत नमूद केले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकGovernmentसरकार