शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाची सरकारकडून घोषणा; ५३% भांडवल विक्रीसाठी निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 07:02 IST

शेअर्सच्या सध्याच्या भावानुसार ‘बीपीसीएल’चे बाजारमूल्य ८७,३८८ कोटी रुपये असून त्यातील सरकारी भांगभांडवलाचे मूल्य ४६ हजार कोटी रुपये आहे

नवी दिल्ली : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल)मधील ५२.९८ टक्के सरकारी भांडवल विकण्यासाठी इच्छुकांकडून निविदा मागवून तिचे खासगीकरण करण्याचा इरादा केंद्र सरकारने शनिवारी जाहीर केला. सरकारने एकाच वेळी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी निर्गुंतवणूक असून, यंदाचे २.३ लाख कोटींच्या निर्गंुतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होणे यावरच वव्हंशी अवलंबून असेल.

गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता विभागाने यासाठीच्या निविदांचा तपशील जाहीर केला. त्यानुसार ‘बीपीसीएल’ कंपनीतील सरकारचे ५२.९८ टक्के भागभांडवल (११४.९१ कोटी शेअर) व कंपनीचे व्यवस्थापकीय नियत्रणही खासगी उद्योगाकडे वर्ग करण्यात येणारआहे. मात्र आसाममधील नुमलीगढ तेलशुद्दिकरण कारखाना चालविण्यासाठी स्थापलेल्या स्वतंत्र कंपनीतील ‘बीपीसीएल’चे ६१.६५ टक्के भांडवल विकले जाणार नाही.

शेअर्सच्या सध्याच्या भावानुसार ‘बीपीसीएल’चे बाजारमूल्य ८७,३८८ कोटी रुपये असून त्यातील सरकारी भांगभांडवलाचे मूल्य ४६ हजार कोटी रुपये आहे. डिलॉईट तोहमात्सु इंडिया यांना या निर्गुंतवणुकीसाठी सल्लागार म्हणून नेमले आहे.निविदेसाठीच्या अटी

  • सार्वजनिक क्षेत्रातील कोणताही कंपनी निविदा भरण्यास अपात्र.
  • १० अब्ज अमेरिकी डॉलर मूल्य असलेली खासगी कंपनीच पात्र.
  • जास्तीत जास्त चार खासगी कंपन्या एकत्रितपणे निविदा भरू शकतील. त्यापैकी मुख्य कंपनीचा त्यात किमान ४० टक्के वाटा असायला हवा.
  • सुरुवातीच्या चार महिन्यांत एकत्रित निविदाकारांपैकी सहभागी कंपन्या बदलता येतील. मात्र मुख्य कंपनी तीच कायम ठेवावी लागेल.
  • ही निविदा प्रक्रिया दोन टप्प्यांची असेल. पहिल्या टप्प्यात स्वारस्य व्यक्त केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात स्वारस्यदारांना स्पर्धात्मक बोली सादर करावी लागेल.

मालमत्तेचे स्वरूप

  • बहुसंख्य भांडवलासह बीपीसीएलचे संपूर्ण व्यवस्थापकीय नियंत्रण.
  • मुंबई, कोची, बिना व नुमलीगढ येथील तेलशुद्धीकरण कारखाने. त्यांची क्षमता वर्षाला २४९ दशलक्ष टन. देशाच्या एकूण क्षमतेच्या १५ टक्के.
  • देशभरातील १५,१७७ पेट्रोल पंप, ६.०११ एलपीजी वितरक एजन्सी व ५१ एलपीजीच्या टाक्या भरण्याचे कारखाने.
  • देशाच्या इंधन बाजारपेठेतील २१ टक्के हिस्सा व विमानांमध्ये इंधन बरण्याची ५१हून अधिक केंद्रे.
टॅग्स :Petrolपेट्रोलCentral Governmentकेंद्र सरकार